Asia Cup 2018 : अफगाणिस्तानचा शहजाद तेव्हा धोनीसाठी प्रार्थना करत होता..!

वृत्तसंस्था
Wednesday, 26 September 2018

शहजाद भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता आहे. त्याला धोनीच्या शैलीत फटकेबाजी करायला आवडते. त्याला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉटही खेळता येतो. भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी त्याने आपण धोनीसाठी झोपही पणाला लावू शकतो असे स्पष्ट केले होते. 

दुबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा सलामीवीर महंमद शहजाद याने 11 चौकार आणि सात षटकारांसह 124 धावांचा पाऊस पाडला. शहजाद भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता आहे. त्याला धोनीच्या शैलीत फटकेबाजी करायला आवडते. त्याला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉटही खेळता येतो. भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यापूर्वी त्याने आपण धोनीसाठी झोपही पणाला लावू शकतो असे स्पष्ट केले होते. 

''एकदा टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळत होती. धोनी फलंदाजी करत होता आणि शेवटच्या ओवरमध्ये 15 धावांची गरज होती. ते रमजानचे दिवस होते. इफ्तार सुरू व्हायला 3 ते 4 मिनिटे बाकी होती आणि माझ्यासमोर जेवणाचे ताट होते. त्या काळात देवाकडे काहीही मागितलं तरी मिळते. धोनी त्या सामन्याआधी दुखापतग्रस्त होता आणि तो फक्त श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळायला उतरला होता. तेव्हा मी देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली आणि धोनीनेच भारताला हा विजय मिळवून द्यावा अशीही प्रार्थना केली. तो सामना धोनीने षटकार मारत जिंकला होता. त्यावेळी मी माझं जेवणही काही वेळासाठी थाबंवले होते. मी धोनीसाठी झोपही पणाला लावू शकतो,’ असे शहजादने त्याच्या मुलाखतीत सांगितले होते.

एशिया कपच्या सुपर 4 सामन्यात अफगाणिस्ताचा यष्टीरक्षक मोहम्मद शहजादने शानदार शतक साजरे गेले. धोनीचा कर्णधार म्हणून 200 वा सामना असतानाच शहजादने  भारताविरुद्धचे पहिले शतक झळकावले. धोनी हा शहजादचा आर्दश असून तो धोनीच्या अनेक गोष्टी फॉलो करतो. 

संबंधित बातम्या