सकलेन असूनही मोईनची हरभजनसिंगकडे धाव

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

लंडन : चौथ्या कसोटीत भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या फिरकीवर नाचविणाऱ्या इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीच्या गोलंदाजीला धार निर्माण करण्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताकचा मोठा वाटा आहे. मात्र, असे असूनही ऑफस्टंपच्या बाहेर असलेल्या 'रफ'चा वापर कसा करावा या प्रश्नाच्या उत्तरासाठी मोईनने भारताचा माजी फिरकीपटू हरभजसिंगकडे धाव घेतली आहे.  

''ऑफस्टंपच्या बाहेर असलेल्या 'रफ'चा पुरेसा वापर करता येत नसल्याचे मोईनच्या लक्षात आले आणि म्हणूनच त्याने त्याच्या गोलंदाजीची शैली पाहण्यास मला विचारले.'' असे हरभजनने एक वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. 

कौंटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडून खेळलेल्या आणि ओव्हल मैदानाची चांगली माहिती असलेल्या हरभजनने मोईनला 'रफ' कडे जास्त लक्ष न देण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, ''मोईन चांगली गोलंदाजी करत आहे. मात्र तो 'रफ'वर चेंडू टाकण्याचा खूप प्रयत्न करत आहे, ज्याची मुळात काही गरज नाही. कारण, या खेळपट्टीवर एजेस बाऊल मैदानासारख्या मोठ्या भेगा नसल्याने 'रफ'वर चेंडू टाकणे एवढे महत्त्वाचे नाही, असे मी त्याला सांगितले.''

अखेरच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोईनने हरभजनने सांगितल्याप्रमाणे मारा केला. त्यानी घेतलेले दोन्ही बळी हे 'रफ' पासून लांब टाकलेल्या चेंडूवर बाद झाले होते. ''मी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मोईनने खेळ केला हे पाहून मला आनंद झाला. दुसऱ्या डावात खेळपट्टीवरील भेगा बाढतील आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या खेळातही बदल करावा लागेल,'' असे मत हरभजनने स्पष्ट केले.   

​ ​

संबंधित बातम्या