आता मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही; क्रिकेटपटूचा धक्कादायक निर्णय 

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने अनिश्चित काळासाठी कसोटी क्रिकेटमधून ब्रेकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीही घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

लंडन : इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने अनिश्चित काळासाठी कसोटी क्रिकेटमधून ब्रेकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीही घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

INDvsSA : पंतला मिळालं या दिग्गजाकडून खास ट्रेनिंग; आता तरी सुधार!

ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. तो केवळ पहिल्या सामन्यात अंतिम संघात खेळला त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. 

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ नकोस अशी निवंती इंग्लंडच्या संघाचे संचालक ऍश्ले गिल्स यांनी त्याला केल्याने त्याला निवृत्तीचा निर्णय घेता आलेला दिसत नाही. ऍशेस मालिकेत आणि त्याआधी झालेल्या विश्वकरंडकातही त्याला चांगली कामगिरीअभावी अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते.  

जोफ्रा आर्चरचं नशीब फळफळलं; मिळणार कोहलीपेक्षा जास्त मानधन

सध्या माईन 32 वर्षांचा असल्याने त्याने फक्त मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो पुन्हा कसोटी क्रिकेट खेळल असा विश्वास गिल्स यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ''त्याला फक्त काही काळ कसोटी क्रिकेटमदून विश्रांती हवी आहे. तो इंग्लंडच्या संघाचा खूप मोठा सेवक राहिला आहे त्यामुळेच त्याच्यासाठी मी संघाची दारं कायम उघडी ठेवेल.''

 


​ ​

संबंधित बातम्या