महिलांचे आयपीएल पुढच्यावर्षीपासून सुरु करावे, मितालीची बीसीसीआयकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

महिला आयपीएल संबंधी सतत चर्चा होत असते, आता भारताच्या महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)कडे मोठी मागणी केली आहे.

महिला आयपीएल संबंधी सतत चर्चा होत असते, आता भारताच्या महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)कडे मोठी मागणी केली आहे. मितालीने महिलांसाठी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे आयोजन करण्यासाठी आणखी वाट पाहिली जाऊ शकत नाही असे सांगीतले, त्याबरोबरच 2021 पासून महिलांचे आपीएल सामने सुरु करण्याची मागणी केली आहे.

कोरोनामुळे आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर

मिथाली म्हणाली की, ‘बीसीसीआय सुरुवातीली लहान स्वरुपात अशा क्रिडा स्पर्धेचे आयोजन करु शकते, त्याचबरोबर आयपीएलच्या काही नियमांमध्ये बदल करुन चार एवजी सहा विदेशी खेळाडू एका संघात घेतले जाऊ शकतात.’ मिथालीने क्रिकइंन्फो या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. टी20 वल्डकप मध्ये ऑस्ट्रेलियाकडून परभव स्विकारवा लागल्यानंतर दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी देखील महिला आयपीएलला पठिंबा दिला होता.

रॉजर फेडरर, पत्नी मिरका यांची गरजू कुटुंबांना मोठी मदत

मागच्या वर्षी महिला क्रिकेटला उभारी देण्यासाठी मिनी आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी चार संघात सात मॅचेस खेळवण्याची योजाना बीसीसीआय करत आहे. पण कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीयल च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष झाल्यावर पुर्ण महिला आयपीएल सुरु होण्यासाठी अद्याप चार वर्षांचा कालावधी लागेल, कारण भारताकडे आणखी तेवढ्या महिला क्रिकेटपटू नसल्याचे सांगीतले होते.


​ ​

संबंधित बातम्या