World Cup 2019 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकचे कोच करणार होते आत्महत्या

वृत्तसंस्था
Tuesday, 25 June 2019

 भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचे मार्गदर्शक मिकी आर्थर यांनी आत्महत्येचा विचार केल्याचा खुलासा केला आहे. 

वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचे मार्गदर्शक मिकी आर्थर यांनी आत्महत्येचा विचार केल्याचा खुलासा केला आहे. 

रविवारी (23 जून) लॉर्ड्सच्या मैदानात दक्षिण अफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफ्रिकेचा 49 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यानंतर पाकिस्तानचे कोच मिकी आर्थर यांनी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी मागच्या रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आत्महत्येचा विचार मनात आल्याची धक्कादायक गोष्ट त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.  

आर्थर म्हणाले, " पाकिस्तानच्या संघाचा जेव्हा भारताने पराभव केला तेव्हा पाकिस्तानच्या संघावरचे दडपण वाढले होते. माझ्या मनात त्यावेळी आत्महत्येचा विचार आला होता. परंतु त्यावेळी आत्महत्या केली नाही ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला." 

आर्थर पुढे असही म्हणाले की, "विश्वकरंडक स्पर्धेत एकदा तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला की पुन्हा तुमचा पुन्हा पराभव होण्याची शक्यता जास्त असते. कारण आधी झालेल्या पराभवामुळे संघावर दडपण असते. माझ्यावरही दडपण आले होते. परंतु दक्षिण अफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने समाधानकारक कामगिरी केली."

16 जून रोजी भारत-पाकिस्तान या दोन संघात विश्वकरंडक स्पर्धेतील हाय व्होल्टेज क्रिकेट सामना रंगला होता. या सामन्यात भारताने  336 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करुन पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय नोंदवला. पाकिस्तानच्या निष्प्रभ गोलंदाजीमुळे सुरूवातीपासुनच भारताचे सामन्यावर वर्चस्व राहिले होते.


​ ​

संबंधित बातम्या