क्रिकेट सुरू न करण्यावरून 'या' खेळाडूने केला पंतप्रधानांनाच विरोध

टीम ई-सकाळ
Wednesday, 24 June 2020

"स्थानिक क्रिकेटसाठी सध्या सुरू असलेली बंधने इतक्‍यात उठवणे कठीण आहे. क्रिकेटचा चेंडू हा कसा 'वाहक' ठरू शकतो याची सर्वांनाच जाणीव आहे. त्याचा संक्रमणाचा वेगही अधिक ठरू शकतो. क्रिकेटला कोविड मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु काही नियम बदलू शकत नाही.'' असे बोरिस जॉन्सन यांनी म्हटले होते. 

लंडन : कोरोना महामारीनंतर इतर खेळ सुरू होत असले तरी क्रिकेट अजूनही लॉकडाऊनमघ्ये आहे. एकमेव आशेचा किरण इंग्लंडमधून दिसून येत आहे. पुढील महिन्यात भले तेथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात भकसोटी क्रिकेट सुरू होत असले तरी स्थानिक क्रिकेटबाबत ब्रिटनचे पंतप्रधान अनुकुल नाहीत. त्यांनी थेट नकार दर्शवला आहे, पण त्यांच्या या निर्णयाचा विरोध करण्याचे धाडस इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि त्यांचा माजी कर्णधार मायकेल वॉनने दाखवले आहे.  बिगर व्यावसाईक क्रिकेट ब्रिटनमध्ये सुरू करण्यास नकार देणाऱ्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निर्णयावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टीका केली आहे. क्रिकेटचा चेंडू हा विषाणूचा वाहक आहे, असे संबोधून जॉन्सन यांनी कालच नजिकच्या काळात ब्रिटनमध्ये क्रिकेट सुरू होणार नाही याचे संकेत दिले. वेस्ट इंडीजचा संघ लंडनमध्ये कसोटी मालिकेसाठी दाखल झालेला आहे. त्यांचे कॉरंटाईनही संपलेले आहे.

'कोरबो लोरबो जीतबो रे...'साठी शाहरुख-गंभीरमध्ये हे ठरलं होतं तर...

या मालिकेद्वारे कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होत आहे. जैविक वातावरणातून हे क्रिकेट होणार आहे, परंतु बोरिस जॉन्सन यांचा लंडनमधील स्थानिक क्रिकेटला विरोध आहे.  मायकेल वॉनने मात्र आपल्या देशाच्या पंतप्रधानांनाच विरोध केला आहे. हॅंड सॅनिटायझर प्रत्येकाचा खिशात असेल जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूला हात लावाल तेव्हा तेव्हा याचा वापर कर...सोप आहे, असे ट्‌विट वॉनने केले आहे.  वास्तविक स्थानिक क्रिकेटबाबतचा हा प्रश्‍न जॉन्सन यांना लोकसभेत विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते. "स्थानिक क्रिकेटसाठी सध्या सुरू असलेली बंधने इतक्‍यात उठवणे कठीण आहे. क्रिकेटचा चेंडू हा कसा 'वाहक' ठरू शकतो याची सर्वांनाच जाणीव आहे. त्याचा संक्रमणाचा वेगही अधिक ठरू शकतो. क्रिकेटला कोविड मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु काही नियम बदलू शकत नाही.'' 

'द्रविड हा सचिन-गांगुलीपेक्षा भारी होता'

एकीकडे बोरिस जॉन्सन स्थानिक क्रिकेटला अजूनही ड्रेसिंग रुममध्येच ठेवण्याचा विचार बोलून दाखवत असले तरी इंग्लंड क्रिकेट मंडळ 4 जुलैपासून क्रिकेटला पुन्हा मैदानावर आणण्याची तयारी करत आहेत. क्रिकेट हा सर्वात कमी संपर्क खेळ आहे त्यामुळे धोकाही कमी आहे, सुरक्षित अंतर ठेऊन क्रिकेट खेळले जाऊ शकते, असे इंग्लंड मंडळाने स्पष्ट केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि इंग्लंड क्रिकेट मंडळासह माजी कर्णधार मायेकल वॉन यांच्यात "क्रिकेट वॉर' सुरू झालेले असले तरी याच ब्रिटनमध्ये 8 जूलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे त्या लढतीवर अख्ख्या क्रिकेट विश्‍वाचे लक्ष लागून राहिले आहे.


​ ​

संबंधित बातम्या