INDvsSA : भारतातील खेळपट्ट्या बोअरींग; हा तर धडधडीत आरोप करतोय

वृत्तसंस्था
Saturday, 12 October 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान इंग्लंडच्या संघावर टीका केलेले आणि मग आहेर पत्करावे लागलेले माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी भारतीय क्रिकेटमध्येही नाक खुपसले आहे. भारतातील खेळपट्ट्या बोअरींग असतात असा त्यांचा दावा आहे.

लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान इंग्लंडच्या संघावर टीका केलेले आणि मग आहेर पत्करावे लागलेले माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी भारतीय क्रिकेटमध्येही नाक खुपसले आहे. भारतातील खेळपट्ट्या बोअरींग असतात असा त्यांचा दावा आहे. तेथे गोलंदाजांना जास्त ऍक्शन दाखविता आली पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.

INDvsSA : संघातून हाकलंल होतं तरी शेवटी ब्रेक थ्यू त्यानंच मिळवून दिला ना!

त्यांनी शुक्रवारी ट्वीट केले की, भारतातील कसोटींत पहिले तीन-चार दिवस बॅटचे (फलंदाजांचे) प्रमाणाबाहेर वर्चस्व राहते. वास्तविक गोलंदाजांना जास्त अॅक्शन दाखविता येईल अशा परिस्थितीची गरज आहे. आजच्यासाठी मी हाच विचार आपणासमोर मांडतो आहे. पहिल्या दोन्ही कसोटींत भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजविले. विशाखापट्टणमला भारताने 7 बाद 502 धावसंख्येवर डाव घोषित केला. त्यानंतर पुण्यात 5 बाद 601 अशी धावसंख्या उभारली.

Virat Kohli- Ravindra Jadeja

पेशवाईसाठी प्रसिद्ध अससेल्या पुण्यात शुक्रवारी गहुंजे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर विराटशाही अवतली होती. भारतीय क्रिकेटमध्ये सात द्विशतक करणारा फलंदाज, क्रिकेट विश्वात कर्णधार म्हणून सात द्विशतके करणारा पहिला कर्णधार, सात हजार कसोटी धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम असे एक ना अनेक विक्रम रचणाऱ्या विराटने कमालच केली.

सत्ते पे सत्ता! महानायकला किंग कोहलीची सप्तरंगी बर्थडे गिफ्ट 

असे विक्रम पादाक्रांत करत असताना विराटने त्रिशतकाचा मोह टाळून संघहितही जपले आणि भारताचा पहिला डाव 5 बाद 601 धावसंख्येवर घोषित केला. भारताने उभ्या केलेल्या धावांच्या हिमालयासमोर दुसऱ्या दिवस अखेरीस दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 36 अशी अवस्था केली. खेळ थांबला तेव्हा थेऊनिस ब्रुईन 20 आणि नाईट वॉचमन अॅन्रिच नॉर्ते 2 धावांवर खेळत होता.  

Image

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यावर आतापर्यंत आफ्रिकेचे आणखी दोन बळी गेले असून त्यांची अवस्था 22.2 षटकांत पाच बाद 57 धावा केल्या आहेत. 

 


​ ​

संबंधित बातम्या