मायकेल वॉन कोहलीला म्हणाले, ''Worst Reviewer In The World''

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉर्न याने भारताचा कर्णधार विराट कोहलीवर डीआरएसच्या बाबतीत क्रीडाविश्वातील सर्वात अयशस्वी कर्णधार असल्याची टीका केली आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे यात कोणालाही शंका नाही, मात्र, 'Descision Review System' (डीआरएस) मध्ये तो सर्वात अयशस्वी कर्णधार ठरला आहे. मायकेल वॉर्न यांनी नेहमीच कोहलीचे कौतुक केले आहे यावेळी मात्र त्यांनी आपल्या ट्विटमधून कोहलीवर 'worst reviewer in the world' अशी टीका केली आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विराट कोहलीने घेतलेले दोन्ही रिव्ह्यू वाया गेल्याने त्याच्यावर चाहत्यांनी टिका केली आहे. कोहलीने पहिल्या 12 षटकांमध्येच दोन्ही रिव्ह्यू वापरले आणि ते देन्ही चुकीचे ठरल्याने वाया गेले. या दोन्ही रिव्ह्यूच्या वेळी रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता. पहिल्या वेळेस इंग्लंडचा सलामीवीर किटॉन जेनिंग्ज पायचित असल्याचे जडेजाने अपिल केले, मात्र पंचानी ते फेटाळून लावले तरीही जडेजाने कर्णधारा रुव्ह्यू घेण्यासाठी आग्रह केला. मात्र, तिसऱ्या पंचांनीसुद्धा तो नाबाद असल्याचेच सांगितले. काही षटकांनंतर पुन्हा आपला अखेरचा सामना खेळणारा अॅलिस्टर कुक पायचित असल्याचे जडेजाने अपिल केले. मात्र तेही पंचानी फेटाळून लावले. यावेळीही रिव्ह्यू घेण्यात आला आणि भारताने पुन्हा तो गमावला.

​ ​

संबंधित बातम्या