हेतू सफल होताच मियॉंदादकडून पंतप्रधान इम्रान खान यांची माफी 

शैलेश नागवेकर
Saturday, 22 August 2020

पाकिस्तान संघात खेळत असताना सहकारी असले तरी इम्रान खान आणि जावेद मियॉंदाद यांच्यात शितयुद्ध कायम असायचे. आत्ताही इम्रान खान पंतप्रधान असले तरी मियॉंदाद यांचा दृष्टीकोन बदललेला नाही.

कराची : पाकिस्तान संघात खेळत असताना सहकारी असले तरी इम्रान खान आणि जावेद मियॉंदाद यांच्यात शितयुद्ध कायम असायचे. आत्ताही इम्रान खान पंतप्रधान असले तरी मियॉंदाद यांचा दृष्टीकोन बदललेला नाही. मात्र स्वतःचा हेतू सफल झाल्यावर इम्रान खान यांच्यावर केलेल्या शेरेबाजीबद्दल मियॉंदाद यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

पंतप्रधानांच्या नेतृत्वावर मियॉंदाद यांनी काही दिवसांपूर्वीच टीका केली होती. परंतु मियॉंदाद यांचा भाचा फैझल इक्‍बालची देशांतील एका संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यावर मियॉंदाद यांनी भूमिका बदलली. मी माझे शब्द मागे घेतो आणि खासकरुन पंतप्रधान इम्रान यांची माफी मागतो. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाची कामगिरी सूमार झाल्यामुळे माझा संताप झाला होता, असे कारण मियॉंदाद यांनी दिले. इम्रान खान पाकिस्तान क्रिकेटचे नुकसान करत आहेत अशीही टीका मियॉंदाद यांनी केली होती.


​ ​

संबंधित बातम्या