मेस्सी 11 वर्षांनी सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीतून बाहेर

वृत्तसंस्था
Tuesday, 4 September 2018

फिफाच्या सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराच्या शर्यतीत पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियाने रोनाल्डोला क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीच आणि इजिप्तचा फुटबॉलपटू महंमद सलाह यांचे आव्हान आहे. व्यावसायिक लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याने या तिघांनाही अंतिम नामांकन देण्यात आले आहे. मात्र अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलेले नाही. 

लंडन : फिफाच्या सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराच्या शर्यतीत पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियाने रोनाल्डोला क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीच आणि इजिप्तचा फुटबॉलपटू महंमद सलाह यांचे आव्हान आहे. व्यावसायिक लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याने या तिघांनाही अंतिम नामांकन देण्यात आले आहे. मात्र अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलेले नाही. 

मेस्सीने अनेक वर्षे या पुरस्कारावर वर्चस्व गाजवले आहे. गेल्या 11 वर्षांपासून पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवूनही मेस्सीला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्करासाठी नामांकन देण्यात आलेले नाही. मेस्सीने 2007 आणि 2008 मध्ये तो उपविजेता होता. त्यानंतर मात्र त्याने 2009पासून सलग पाच वर्षे हा पुरस्कार पटकावला होता. 

रोनाल्डोनेसुद्धा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पाचवेळा पटकावला आहे. मेस्सीच्या अनुपस्थितीत त्याला हा पुरस्कार पटकावण्याची जास्त संधी आहे. रोनाल्डोने यंदा हा पुरस्कार पटकावला तर तो पाचवेळा पुरस्कार मिळवलेल्या मेस्सीला मागे टाकेल. 

मॉड्रीचने रेयाल माद्रिद क्लब आणि राष्ट्रीय संघाकडून उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्या कुशल नेतृत्वाखाली क्रोएशियाच्या संघाने प्रथमच विश्वकरंडकाची अंतिम फेरी गाठली होती. तसेच इजिप्तचा फुटबॉलपटू सलाहने लिव्हरपूल क्लबकडून पहिल्याच मोसमात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.  

नुकतेच क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचने युएफाचा (UEFA : Union of European Football Association) सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. मात्र या पुरस्कारासाठी रोनाल्डोला नामांकन देण्यात न आल्याने त्याचे व्यवस्थापक जॉर्ज मेंडिस यांनी नाराजी व्यक्त केली होती.  
 


​ ​

संबंधित बातम्या