मीराबाई चानूची आशियाई स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था
Tuesday, 7 August 2018

भारताची वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने पाठीला झालेल्या दुखापतीमुळे 18 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

नवी दिल्ली : भारताची वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने पाठीला झालेल्या दुखापतीमुळे 18 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. भारताचे प्रमुख प्रशिक्षक विजय शर्मा यांनी नुकतेच तिला स्पर्धांना मुकावे लागण्याची शक्यताही व्यक्त केली होती. 
त्यानंतर आज (मंगळवार) मीराबाई चानू हिने आशियाई स्पर्धांतून माघार घेतली. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे सचिव सहदेव यादव यांनी याबाबत माहिती दिली.

टोकओ ऑलिम्पिक स्पर्धेला पात्र ठरण्याचे लक्ष्य ठेऊन तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मे महिन्यापासून मीराबाई चानू हिला पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. ती अद्यापही दुखापतीतून सावरलेली नाही. 

''आशियाई स्पर्धेला काही दिवसच शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मीराबाईने जड वजन उचलणे योग्य नाही. त्याचा परिणाम तिच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर होऊ शकतो आणि अखेर आशियाई स्पर्धांपेक्षा ऑलिम्पिक स्पर्धा अधिक महत्त्वाची आहे'', असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

नोव्हेंबरमध्ये अश्गाबात येथे होणारी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही पहिली स्पर्धा आहे.
 

संबंधित बातम्या