बाळामुळं हा खेळाडू टाळेबंदीनंतरच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार

टीम ई-सकाळ
Wednesday, 3 June 2020

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात जूलैच्या पहिल्या आठवड्यातच होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मी खेळणार की नाही याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. यासंदर्भात मी संघ व्यवस्थापनासोबत चर्चा करत आहे.

लंडन : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील जन-जीवन विस्कळीत झाले आहे. खेळावरही याचा मोठा परिणाम झाला असून जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळापासून इतर खेळप्रकरासह क्रिकेटची मैदाने ओस पडली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जगभरातील राष्ट्रांनी लॉकडाउनचा निर्णय घेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सक्ती केली होती. महा साथीच्या रोगातून जग सावरत असून अनेक देशात खेळाच्या स्पर्धेचं वेळापत्रक नव्याने सेट करण्यात येत आहे.

यंदाच्या आयपीएलसाठी धोनी खूपच खास तयारी करत होता : सुरेश रैना 

वेस्ट इंडिजचा संघ 8 जैलैपासून इंग्लंड दौऱ्यावर आहे. प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणाऱ्या इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीला इंग्लंडचा कर्णधार मुकणार असल्याचे संकेत मिळत आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रुटची पत्नी लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. याकारणामुळे जो रुट वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त आहे.  

'सुन्या सुन्या मैफली'त रंग भरण्यास भारतीय क्रिकेट सज्ज; पण...

जो रुट म्हणाला की, वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात जूलैच्या पहिल्या आठवड्यातच होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मी खेळणार की नाही याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. यासंदर्भात मी संघ व्यवस्थापनासोबत चर्चा करत आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी पत्नीसोबत रहाणे गरजेचे आहे. त्यामुळे कदाचित पहिल्या कसोटी सामन्यासाठी मला मुकावे लागू शकते. बेन स्टोक्समध्ये नेतृत्व क्षमता असून तो संघाला विजय मिळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असेही रुटने म्हटले आहे.  

या कारणामुळे स्मिथने दोन महिन्यापासून बॅटला हातही लावला नाही

नुकतेच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यास संमती दिली. वेस्ट इंडिज-इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने सरावही सुरु केला आहे. यॉर्कशायर क्लबने जो रुट सराव करत असलेला एक व्हिडिओ आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केला आहे. सरावाला सुरुवात केली असली तरी रुट पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणे कठिण दिसते.  


​ ​

संबंधित बातम्या