क्रीडा पुरस्कार जाहीर होण्याआधीच मेरी कोमवरुन वाद

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी निवड चाचणीशिवाय मेरी कोमचा भारतीय संघातील समावेश जसा चर्चेत आला, तसाच वाद आता तिच्या क्रीडा पुरस्कार समितीमधील समावेशावरून निर्माण होत आहे. 
देशाचे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्यावर वाद निर्माण होत असतात. या वेळी जाहीर होण्यापूर्वीच वादाला सुरवात झाली आहे.

नवी दिल्ली - जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी निवड चाचणीशिवाय मेरी कोमचा भारतीय संघातील समावेश जसा चर्चेत आला, तसाच वाद आता तिच्या क्रीडा पुरस्कार समितीमधील समावेशावरून निर्माण होत आहे. 
देशाचे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्यावर वाद निर्माण होत असतात. या वेळी जाहीर होण्यापूर्वीच वादाला सुरवात झाली आहे. क्रीडा मंत्रालयाने या वेळी सर्व पुरस्कार्थींची निवड करण्यासाठी एकच 12 सदस्यीय समितीची निवड केली आहे. यात मेरी कोमचा सदस्य म्हणून समावेश आहे. मात्र, या वेळी परस्पर हितसंबंधाचा मुद्दा दूर ठेवण्यात आल्याची टिका होत आहे.

कारण, मेरीचा समावेश असणारी समिती क्रीडा मार्गदर्शकाची देखील निवड करणार आहे आणि मेरीच्या वैयक्तिक प्रशिक्षकांनी या वेळी या पुरस्कारासाठी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या बॉक्‍सिंग शिबिरात ते देखील मेरीबरोबर सहभागी झाले आहेत. 

समावेशापासूनच वाद 
मेरीचा या समितीत समावेश करण्यात आला तेव्हापासून या वादाला सुरवात झाली. तेव्हापासून परस्पर हितसंबंधाचा मुद्दा आडून आडून मांडला जात होता. मेरी सध्या विद्यमान खेळाडू आहे आणि विद्यमान खेळाडून कुठल्याही समितीत स्थान मिळत नाही. पण, क्रीडा मंत्रालयाने तिचा अनुभव लक्षात घेऊन तिची समितीत निवड केली. मग आता ती प्रशिक्षकाच्या निवडीत कशी सहभागी होऊ शकणार ? या नव्या चर्चेला सुरवात झाली आहे. 

देशामध्ये एकीकडे "बीसीसीआय'मध्ये परस्पर हितसंबंधाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, यात लक्ष्मण, सचिन यांच्यानंतर राहुल द्रविडकडून याबाबत खुलासा मागण्यात आला आहे. "बीसीसीआय'ला नियंत्रणाखाली आणण्यासाठी आग्रही असणारे क्रीडा मंत्रालय मात्र काही नियम जाणुनवुजून विसरत आहेत का ? असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.

संबंधित बातम्या