इतिहास नव्याने लिहिण्याची वेळ

सुनंदन लेले
Tuesday, 13 February 2018

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकण्याची आणखी एक संधी भारताला उद्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात मिळणार आहे. भारताने उद्याच्या सामन्यात मिळविलेला विजय खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत येथील सेंट जॉर्जेस पार्कच्या मैदानावर झालेल्या चारही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे मैदानावरील इतिहासाबरोबर दक्षिण आफ्रिकेतील मालिका विजयाचा इतिहास लिहिण्याची मोठी संधी विराट कोहलीच्या शिलेदारांसमोर उभी आहे. अर्थात, हे सर्व पावसावर अवलंबून असेल. उद्या येथे पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

तीन सामन्यांतील पराभवांनंतर दक्षिण आफ्रिकन संघामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. वॉंडरर्स मैदानावर झालेल्या चौथ्या सामन्यात नशिबाने यजमान संघाला साथ दिली आणि भारताची विजयी शृंखला तुटली. सुटलेले झेल आणि टाकलेल्या नो बॉलने भारतीय संघाचा घात केला. तीन सामने जिंकले असल्याने भारतीय संघ मालिका गमावणार नाही हे नक्की आहे. विराट कोहलीला बरोबरी नकोच आहे. त्याला भारताने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत एक दिवसीय मालिका जिंकलेली पहायची आहे. त्यासाठी भारतीय संघ जोरदार प्रयत्न करणार यात शंका नाही. 

पोर्ट एलिझाबेथ शहरातील सेंट जॉर्जेस पार्क मैदान यजमान संघाकरता नशीबवान ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांत भारतीय संघाला मोठ्या पराभवांचा दणका दिलेला आहे. प्रत्येक वेळी कितीही भारतीय फलंदाजी कागदावर मजबूत दिसली तरी फलंदाजी करताना 200 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. भारतीय फलंदाजीच्या समस्या पूर्ण सुटल्याचे दिसत नाही. मधली फळी अजूनही अपेक्षित धावा करत नाहीये. त्यातून रोहित शर्माला सलग चार सामन्यांत अपयश आले आहे. विराट कोहली आणि शिखर धवन भारतीय धावसंख्येचा भार उचलत आले आहेत. त्यामुळे या दोघांवरच प्रामुख्याने भारताच्या फलंदाजीचा भार असेल असेच चित्र आहे. 

एका सामन्यातील विजयाने दक्षिण आफ्रिकन संघातून नाहीसा झालेला आत्मविश्‍वास परतला आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता आक्रमणाचा मार्ग फलंदाजांना सापडला आहे. पाचव्या एक दिवसीय सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांना टप्पा आणि लय सापडू नये या करता मोठे फटके मारण्याचा मनसुबा फलंदाज बाळगून आहेत. 

दोनही संघात बदल होण्याची शक्‍यता कमी वाटते. सामन्याच्या आदल्या दिवशी सेंट जॉर्जेस पार्क मैदानावरील विकेटवर गवताची छटा दिसत असली तरी सामन्याच्या दिवशी गवत काढून जोरदार रोलींग करून फलंदाजीकरता पोषक विकेट बनवले जाईल असे समजले. सामन्याच्या दिवशी पहाटे जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवली गेली आहे ज्याचे पोर्ट एलिझाबेथचे रहिवासी स्वागत करतील कारण या भागातही दुष्काळाचे सावट गेले दोन वर्ष घोंघावत आहे. सकाळपासून परत पाऊस पडणार नाही असे सांगितले जात आहे म्हणजे सामना निर्धोक पार पडेल, असेच संयोजक मानत आहे. 

आम्ही चांगला खेळ करायला खूप मेहनत करत होतो. योजना आखत होतो. त्यात आम्हाला चौथ्या सामन्यात यश आले. या एका विजयाने संघात चैतन्य आले. दडपण झुगारून वॉंडरर्स सामन्यात खेळ झाल्यामुळे यश आले. पाचव्या सामन्यात भारतीय फिरकीला तोंड देताना योग्य आक्रमण करायचा आमचा विचार आहे. 
- अँडील फेहलुकवायो, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू

​ ​

संबंधित बातम्या