ब्रिस्बेनमधील स्पर्धेतूनही नदालची माघार 

पीटीआय
Friday, 29 December 2017

ब्रिस्बेन : स्पेनचा मातब्बर टेनिसपटू रॅफेल नदाल याला मोसमाच्या प्रारंभीच दुखापतींनी त्रस्त केले आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून तो पूर्णत: तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे त्याला ब्रिस्बेनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन या मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सहभागी होण्याची अशा त्याने व्यक्त केली आहे. 

नदालला लंडनमधील एटीपी टूर वर्ल्ड फायनल्स स्पर्धेत नदालला डेव्लृड गॉफीनविरुद्ध पराभूत व्हावे लागले. तेव्हापासून तो स्पर्धात्मक पातळीवर खेळलेला नाही. वर्षअखेरीस अबुधाबीत होणाऱ्या मुबादला जागतिक प्रदर्शनी स्पर्धेत तो खेळणार होता, पण त्याला माघार घ्यावी लागली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नदाल 31 वर्षांचा आहे. तो म्हणाला की, सरत्या वर्षातील मोसम प्रदीर्घ ठरला. त्यामुळे मला पूर्वतयारी सुरू करण्यास उशीर झाला. परिणामी अजून सज्ज झालेलो नाही. 

नदाल चार जानेवारी रोजी मेलबर्नमध्ये दाखल होईल. ऑस्ट्रेलियन ओपन 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी नदालला पाच सेटच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात रॉजर फेडरर याच्याकडून पराभूत व्हावे लागले. त्याने सांगितले की, ब्रिस्बेनमध्ये खेळू शकणार नाही हे जाहीर करताना मला दु:ख होते. तेथे खेळण्याची माझी इच्छा होती, पण आता मी चार जानेवारी रोजी मेलबर्नमध्ये येईन आणि माझ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांना भेटेन. मी ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सराव सुरू करेन. 

2017 मध्ये नदाल 
- दहावे फ्रेंच विजेतेपद 
- तिसरे अमेरिकन विजेतेपद 
- दोन मास्टर्स विजेतिपदे 
- मॉंटे कार्लो आणि माद्रिदमध्ये विजेता 
- मोसमाअखेरच्या क्रमवारीत अव्वल 
- कारकिर्दीत चौथ्यांदा अशी कामगिरी

​ ​

संबंधित बातम्या