आता भारताला 'व्हाईटवॉश' देण्याची इच्छा : कागिसो रबाडा 

पीटीआय
Friday, 19 January 2018

जोहान्सबर्ग : सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये भारताची दाणादाण उडविणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 'आम्हाला आता व्हाईटवॉशच हवा आहे' असे वक्तव्य केले आहे. तीन कसोटींच्या मालिकेत भारत 0-2 अशा पिछाडीवर आहे. अंतिम सामन्यास पाच दिवस बाकी असतानाच रबाडाने भारतीय फलंदाजांवर मानसिक दडपण आणण्यास सुरवात केली. 

पहिल्या दोन्ही सामन्यांत यजमान संघाला सहज विजय मिळाले आहेत. पहिल्या सामन्यात रबाडाच्या गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला विजय मिळाला होता. 

रबाडा म्हणाला, "भारतीय वेगवान गोलंदाजांबद्दल आम्हाला आदरच आहे; पण अशी वेगवान गोलंदाजी कशी खेळायची, हे आम्हाला ठाऊक आहे. प्रत्येक सामना आम्ही जिंकण्यासाठीच खेळतो. त्यामुळे आता भारताविरुद्ध निर्भेळ यश मिळविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.'' 

मायदेशात बलवान वाटणारी भारतीय फलंदाजी दक्षिण आफ्रिकेतील दोन्ही सामन्यांत अपयशी ठरली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या 153 धावांचा अपवाद वगळता भारताकडून एकही चांगली कामगिरी झालेली नाही. 'भारतीय संघ कोहलीवरच अवलंबून आहे. अर्थात, आम्हीही दोन-तीन खेळाडूंवर अवलंबून आहोतच. भारताकडे इतर दर्जेदार फलंदाज नाहीत, असे मी म्हणत नाही; पण भारताच्या एकूण धावांपैकी कोहलीचाच वाटा सर्वाधिक असतो', असे रबाडा म्हणाला. 

भारताविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यांच्याकडे कायमच दर्जेदार फलंदाज असतात आणि आता त्यांच्याकडे चांगले गोलंदाजही आहेत. त्यामुळे हा संघ कुणालाही कडवी लढत देऊ शकतो. भारतीय संघाने जगभरात सगळीकडे चांगली कामगिरी केली आहे आणि आता त्यांना इथे विजय मिळवायचा आहे. म्हणून तर मालिकेत चुरस आहे. दोन दर्जेदार संघ मैदानावर एकमेकांशी लढत आहेत आणि मैदानाबाहेर मैत्रिपूर्ण संबंधही आहेत. 
- कागिसो रबाडा 

​ ​

संबंधित बातम्या