टी-20 यशावर आजच शिक्कामोर्तब? 

पीटीआय
Friday, 22 December 2017

इंदूर : श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करून पहिला टी-20 सामना जिंकणाऱ्या भारताला तीन सामन्यांची ही मालिका उद्याच जिंकण्याची संधी आहे. कसोटी, एकदिवसीय आणि आता टी-20 मालिकाही जिंकणे भारतासाठी कठीण नाही. 

कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये रविवारी श्रीलंकेचा संघ रोहित शर्माच्या संघासमोर आव्हानच उभे करू शकला नाही. टी-20च्या तुलनेत भारताने 93 धावांचा मोठा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने श्रीलंका संघाचे केलेले मानसिक खच्चीकरण उद्याच्या सामन्यासाठीही यजमानांची ताकद अधिक भक्कम करणारे ठरणार आहे. 

दक्षिण आफ्रिका दौरा लक्षात घेऊन भारताने या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा या तिघाच खेळाडूंना स्थान दिले. महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता नवोदितांवर भर आहे, पण हा संघही तुलनेने अनुभवी असलेल्या श्रीलंकेपेक्षा सरस ठरेल. 

कटकमध्ये पडलेल्या दवाचा भारतीय गोलंदाजांना फटका बसेल, अशी शक्‍यता वर्तवली जात होती; परंतु यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या मनगटाने चेंडू वळवणाऱ्या फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. त्यामुळे भारतीयांसाठी आता नाणेफेकीचा मुद्दा गौण ठरत आहे. मोहालीतील एकदिवसीय सामन्यातही नाणेफेक गमवल्यावरही भारताने सामना जिंकला होता. 
मालिका जिंकण्यासाठी उद्याचा सामना महत्त्वाचा असल्यामुळे संघात बदल होण्याची शक्‍यता कमी आहे. आता फिरकी गोलंदाजांवरच विश्‍वास वाढलेला असल्यामुळे उद्या कदाचित बुमराऐवजी महंमद सिराज असा बदल केला जाऊ शकतो. कालच्या सामन्यात दिनेश कार्तिकला फलंदाजी मिळाली नव्हती, त्यामुळे एक फलंदाज कमी करून अतिरिक्त गोलंदाज खेळवला जाण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकेल. 

धोनीला चौथा क्रमांक 
भारताने गेल्या काही मर्यादित षटकांच्या सामन्यात यश मिळवलेले असले तरी फलंदाजीतील चौथ्या क्रमांकावर आलटून पालटून संधी देण्यात येत आहे. कालच्या सामन्यात धोनीने दाखवलेली आक्रमकता आणि सामन्यानंतर रोहित शर्माने केलेले वक्तव्य यावरून धोनी चौथ्या क्रमांकावरच खेळणार, हे स्पष्ट झाले आहे.

​ ​

संबंधित बातम्या