भारताच्या दौऱ्यापूर्वी स्मिथचा 'माइंड गेम' 

पीटीआय
Friday, 22 December 2017

नवी दिल्ली : भारताचा बहुचर्चित दक्षिण आफ्रिका दौरा जवळ येऊ लागला तसा भारतीयांवर दडपण टाकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून माइंड गेम सुरू करण्यात आला. भारताच्या फलंदाजांना आमची ताकदवर वेगवान गोलंदाजी कमालीची दडपणाखाली ठेऊ शकेल, असा अंदाज दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केला.

कसोटी मालिकेतला पहिला सामना 5 जानेवारीपासून सुरू होत आहे. 

कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. भारताने सलग नऊ कसोटी मालिका जिंकलेल्या आहेत; परंतु या आफ्रिका दौऱ्यात त्यांची खरी कसोटी लागणार आहे. याचाच फायदा घेत स्मिथने माइंड गेम सुरू केला आहे.

गतमोसमात भारत दौऱ्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 अशी धूळ चारली होती. त्या पराभवाची परतफेड केली जाईल, असे स्मिथला सुचवायचे आहे. 

माझ्या मते दक्षिण आफ्रिका ताकदवर ठरेल. एबी डिव्हिल्यर्सच्या पुनरागमनामुळे फलंदाजीतील ताकद वाढेल. गोलंदाजी तर भलतीच भेदक असेल. अंतिम संघात स्थान देण्यासाठी चार सक्षम पर्याय आहेत. त्यांच्या साथीला दोन नवोदित गोलंदाज असतील. माझ्या मते तीन वेगवान आणि एक फिरकी (केशव महाराज) खेळवले जातील. सहा फलंदाज आणि यष्टिरक्षक क्विंटन डिकॉक हा सातवा फलंदाज असेल. अशी दक्षिण आफ्रिकेची रचना असेल, असे स्मिथ म्हणतो. 

स्मिथ म्हणतो... 

  • केप टाउनमध्ये भारताला चांगली संधी. 
  • आफ्रिकेचे चेंडू अधिक स्विंग होत नाहीत; तर अधिक उसळी आव्हानात्मक ठरते. 
  • केप टाउनमध्ये दुष्काळ पडल्यामुळे खेळपट्टी ठणठणीत झाली असूनस बाउन्स मिळणार नाही. काही प्रमाणात फिरकीलाही स्थान मिळेल. 
  • प्रिटोरिया (दुसरा सामना) आणि जोहान्सबर्ग (तिसरा) येथे मात्र भारतीयांच्या क्षमतेला आव्हान मिळेल. 
  • मायदेशात दक्षिण आफ्रिकेने भारतावर मिळवलेले अपराजित राहण्याचे वर्चस्व यंदाही कायम राहील. 
  • धावा करण्याचे भारतीयांसमोर आव्हान असेल, जर त्यांनी चांगल्या धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेवर दडपण येईल. 
  • भारतासाठी विराट कोहली आणि चेतेश्‍वर पुजारा महत्त्वाचे फलंदाज. 

...तर टीम इंडिया 'विराट' होईल 
2018 मध्ये अजून चांगले यश मिळवण्यासाठी विराट कोहली झपाटलेला असेल. या वर्षात जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात यश मिळवले, तर टीम इंडिया क्रिकेटविश्‍वात एका वेगळ्या उंचीवर जाईल, असेही मत स्मिथने व्यक्त केले. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने बऱ्याच कसोटी मालिका उपखंडात जिंकल्या आहेत. त्यांना अजून पुढे जायचे असेल, तर त्यांना दक्षिण आफ्रिकेत अतिशय चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 
- ग्रॅमी स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार.

​ ​

संबंधित बातम्या