आई-वडील खासदार.. आणि एकही सामना न खेळता मुलगा दिल्लीच्या संघात! 

पीटीआय
Monday, 8 January 2018

नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात 'त्याने' एकही सामना खेळलेला नाही.. तरीही 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठीच्या 'सी. के. नायडू करंडक' स्पर्धेसाठी अचानक त्याची दिल्लीच्या संघात निवड झाली.. कारण 'तो' खेळाडू म्हणजे बिहारमधील वादग्रस्त नेते पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन! दिल्लीच्या संघात सार्थकची 'निवड' झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात 'त्याने' एकही सामना खेळलेला नाही.. तरीही 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठीच्या 'सी. के. नायडू करंडक' स्पर्धेसाठी अचानक त्याची दिल्लीच्या संघात निवड झाली.. कारण 'तो' खेळाडू म्हणजे बिहारमधील वादग्रस्त नेते पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन! दिल्लीच्या संघात सार्थकची 'निवड' झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

पप्पू यादव यांचे मूळ नाव राजेश रंजन आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे ते खासदार आहेत. शिवाय, 'जन अधिकार पक्ष' या नावाचा त्यांचा स्वत:चा एक राजकीय पक्षही आहे. त्यांच्या पत्नी रंजित रंजन या कॉंग्रेसच्या खासदार आहेत. अशा राजकीयदृष्ट्या वजनदार घराण्यातील सार्थकने क्रिकेटमधील करिअरची आशा सोडून दिल्यात जमा होती. मात्र, अचानक दिल्लीच्या संघात त्याची निवड झाली आणि दिल्लीच्या निवड समितीवर चहुबाजूंनी टीका सुरू झाली आहे. 

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सय्यद मुश्‍ताक अली स्पर्धेसाठीही सार्थकची संघातील निवड अशीच वादग्रस्त ठरली होती. त्या स्पर्धेत सार्थकने तीन सामन्यांत एकूण दहा धावा केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेपूर्वी सार्थकने संघनिवडीतून माघार घेतली होती. 'सार्थकने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला असून आता तो शरीरसौष्ठवाकडे वळणार आहे' अशा आशयाचे वृत्त काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. 

यानंतर अचानक सार्थकची आई रंजित रंजन यांनी दिल्ली क्रिकेट मंडळाचे संचालक निवृत्त न्यायाधीश विक्रमजित सेन यांना ई-मेल पाठविला. 'माझा मुलगा याआधी नैराश्‍याच्या त्रासाशी झगडत होता. आता तो पूर्णत: तंदुरुस्त झाला आहे' असा त्या ई-मेलचा आशय होता. शिष्टाचारानुसार, विक्रमजित सेन यांनी हा ई-मेल दिल्लीच्या निवड समितीला पाठविला. अतुल वासन, हरी गिडवानी आणि रॉबिनसिंग यांच्या निवड समितीने सी. के. नायडू करंडक स्पर्धेसाठी सार्थकचे नाव 23 संभाव्य खेळाडूंच्या संघात असल्याचे जाहीर केले. 

विशेष म्हणजे, गेल्या मोसमामध्ये दिल्लीच्या 23 वर्षांखालील संघासाठी भरीव योगदान दिलेल्या हितेन दलालकडे मात्र निवड समितीने दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षी सी. के. नायडू करंडक स्पर्धेत दलालने एक शतक, तीन अर्धशतकांसह 468 धावा केल्या होत्या. यात त्याचा स्ट्राईक रेट 91.58 होता आणि त्याने 17 षटकारही खेचले होते. 

येत्या 27-28 जानेवारी रोजी 'आयपीएल'च्या पुढील मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 'या लिलावामध्ये कमीत कमी रकमेच्या यादीमध्ये तरी आपल्या नावाचा समावेश व्हायला हवा', यासाठी अनेक खेळाडूंनी तगादा लावून देशातील कुठल्या ना कुठल्या संघात स्थान मिळविले आहे, अशी चर्चा राष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. 


​ ​

संबंधित बातम्या