मॅराडोनाच्या शर्टची 13 हजार डॉलरला विक्री

वृत्तसंस्था
Friday, 14 December 2018

नेपल्स (इटली) : फुटबॉल सम्राट दिएगो मॅराडोना याने इटलीतील नापोली क्‍लबकडून खेळताना वापरलेली वैशिष्ट्यपूर्ण 9 नंबरची लाल जर्सी ट्युरिन येथे झालेल्या एका लिलावात तब्बल दहा लाख रुपयांस (13 हजार 600 डॉलर) विकली गेली. 

मॅराडोना सहसा निळी जर्सी घालून खेळायचा. त्याचा नंबरही 10 असाच होता. मात्र, 9 नंबरची लाल जर्सी वैशिष्ट्यपूर्ण होती. एका सामाजिक संस्थेच्या निधी उभारणीसाठी हा लिलाव घेण्यात आला होता. यात फुटबॉल मॅराडोनासह ख्रिस्तिआनो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, झिनादिन झिदेन याफुटबॉलपटूंबरोबर सायकलपटू एडी मर्कक्‍स, रग्बीपटू रिची मॅकॉ यांच्या जर्सींचा समावेश होता. 
 
​ ​

संबंधित बातम्या