Schoolympics 2019 : मॅप्रो स्कूल ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत बरगे- जैनला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

सोळा वर्षांखालील मुलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत अंकित भटेजाने सुवर्ण, कुणाल पवारने रौप्य, तर प्रथमेश पाटीलने कास्यपदक पटकाविले.

कोल्हापूर : सोळा वर्षांखालील मुलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत अंकित भटेजाने सुवर्ण, कुणाल पवारने रौप्य, तर प्रथमेश पाटीलने कास्यपदक पटकाविले. दुहेरीत स्पंदन बरगे व स्पर्श जैनने सुवर्ण, अंकित भटेजा व प्रथमेश पाटीलने रौप्य व कौशिक चौगुले व कृष्णा मानधनेने कास्यपदक मिळविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेतंर्गत टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर झाली. 

निकाल असा :

एकेरी : अंकित भटेजा (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. कुणाल पवार (सेंट झेवियर्स हायस्कूल) (८-२), प्रथमेश पाटील (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. स्पंदन बरगे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) (८-४). दुहेरी : स्पंदन बरगे व स्पर्श जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. अंकित भटेजा व प्रथमेश पाटील (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) (८-५), कौशिक चौगुले व कृष्णा मानधने (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) (८-६).


​ ​

संबंधित बातम्या