डिप्रेशनच्या मुद्यावरुन आजी-माजी क्रिकेटरमध्ये रंगला वाद

सुशांत जाधव
Wednesday, 15 July 2020

आयुष्यात प्रत्येक जण संघर्ष करत असतो. काहींना यश मिळते काहींच्या पदरी निराशा येते. या क्षणाचा आणि आयुष्यातील प्रवासाचा आपण आनंद घेऊयात, अशा आशयाचा संदेश रमेश पोवार यांनी दिलाय.

कोलकाता : बंगालचा क्रिकेटर मनोज तिवारीनं भारतीय संघाचा माजी फिरकीपटू आणि महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या पुश अप चॅलेंजवरुन त्यांची फिरकी घेतली आहे. रमेश पोवार यांनी पुश अप काढतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मानसिक संतुलन स्थिरतेसाठी हा व्यायाम उपयुक्त ठरेल, असा संदेश पोवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. यावर मनोज तिवारीने प्रश्न उपस्थितीत केलाय.   रमेश पोवारने व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय की, धन्यवाद ओजस मेहता! तुम्ही मला 25 पुशअप्स मारण्याचे चॅलेंजसाठी निवडले. ज्यामुळे आत्महत्या आणि मानसिक आजारासंदर्भात जागृकता निर्माण करण्यास मदत होईल.

देशातील क्रीडा प्रगतीसाठी क्रीडामंत्र्यांनी 'हा' मार्ग सुचवलाय

आयुष्यात प्रत्येक जण संघर्ष करत असतो. काहींना यश मिळते काहींच्या पदरी निराशा येते. या क्षणाचा आणि आयुष्यातील प्रवासाचा आपण आनंद घेऊयात, अशा आशयाचा संदेश रमेश पोवार यांनी दिलाय. रमेश पोवार यांच्या ट्विटमधील संदेशावर मनोज तिवारीने आक्षेप नोंदवलाय. त्यानं ट्विटमध्ये लिहिलंय की, पुश अप्स आणि वेडेपणाच्या चॅलेंजमुळे डिप्रेशनमधून एखादा कसे बाहेर पडू शकेल? हे मला कोणी समजावून सांगेल का? मनोज तिवारीच्या प्रश्नावर पोवारने प्रतिक्रियाही दिली आहे. तुम्ही एकटे नाहीत हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकांतात मानसिक यातना सहन करणाऱ्यांना यामुळे आधार मिळू शकतो. ही एक्टिविटी पाहून एकांतातून बाहेर पडू शकतो, असे उत्तर पोवार यांनी दिलंय. 

नवी मुंबईतील फुटबॉलपटूंचा तयारीत नाही खंड

मनोज तिवारीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 12 एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. 2015 पासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या नाही. झिम्बाव्बे दौऱ्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. बंगाल ए संघाचा तो नियमित सदस्य आहे. तिवारीने 125 प्रथम श्रेणीत, 163 लिस्ट ए आणि 178 टी-20 सामन्यात बंगालचे प्रतिनिधीत्व केले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या