काल टीमला स्पर्धेचे विजेतेपद, आज पठ्ठ्या अभिनेत्रीसह बोहल्यावर 

वृत्तसंस्था
Monday, 2 December 2019

मनिष कर्नाटकचा असून तो मुंबईमध्ये लग्न करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्यांनी सर्वांपासून फार हुशारीने हे लपवून ठेवले.

मुंबई : भारताचा फलंदाज मनिष पांडेच्या कर्नाटर संघाने कालच सईद मुश्ताक अली ट्वेंटी20 करंडकाचे विजेतेपद पटकाविले आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज तो आयुष्यातील एक नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज झाला आहे. तो आज  दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी लग्नगाठ बांधणार आहे.

असा आणायचा फॉर्म परत; रुटचे शानदार द्विशतक 

Image result for ashrita shetty

मनिष कर्नाटकचा असून तो मुंबईमध्ये लग्न करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्यांनी सर्वांपासून फार हुशारीने हे लपवून ठेवले.

पांडेने मुंबईमध्ये सोहळा ठेवण्याचे कारण भारतीय संघ आहे. कारण आता केवळ तीन दिवसांतच भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील ट्वेंटी20 मालिका सुरु होणार असून संघ मुंबईत आहे. भारत आणि विंडीज यांच्यात 6 डिसेंबरला वानखेडेवर सामना होणार आहे. 

Image result for ashrita shetty

Breaking : विश्वकरंडकासाठी टीम इंडियाचा तगडा संघ जाहीर

अश्रिताने आतापर्यंत पाच दाक्षिणात्य चित्रपचांमध्ये काम केले असून ती टॉलिवूडमध्ये चांगलीच प्रचलित आहे. विंडीजविरु्ध होणारी ट्वेंटी20 मालिका पांडेसाठी खूप महत्वाची असणार आहे कारण तो ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी अंतिम संघातील स्थान पक्के करण्यासाठी सज्ज असेल.


​ ​

संबंधित बातम्या