नायजेरियाचा निराशाजनक खेळ; क्रोएशिया विजयी (मंदार ताम्हाणे)

मंदार ताम्हाणे
Sunday, 17 June 2018

ड गटामध्ये शनिवारी अर्जेंटिना आणि आइसलँड यांच्यातील सामन्यात बलाढ्य अर्जेंटिना हा सामना जिंकेल असे वाटत असताना पहिल्यांदाच विश्वकरंडकात खेळत असलेल्या आइसलँडने त्यांना बरोबरीत रोखले. आइसलँडने जोरदार खेळ केला. त्यामुळे या ग्रुपमध्ये आता अर्जेंटिनासाठी पुढील दोन सामने महत्त्वाचे असणार आहेत. क्रोएशियाने मिळविलेल्या विजयामुळे अर्जेंटिना या गटात अव्वल राहण्याची शक्यता कमी आहे. 

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटातील क्रोएशिया आणि नायजेरिया यांच्यात झालेल्या सामन्यात क्रोएशियाने नायजेरियाचा 2-0 ने पराभव केला. हा सामना अतीतटीचा होईल असे वाटले होते आणि सामनाही रंगतदार झाला. नायजेरियाच्या खेळाडूने केलेल्या स्वयंगोलामुळे क्रोएशियाला सुरवातीलाच आघाडी मिळवून दिली. क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉडरिच याने कॉर्नरवरून मारलेला चेंडू अँटे रॅबेकच्या डोक्याला लागून मारिओ मान्झुकिच याच्याही डोक्याला लागला आणि तो नायजेरिया एटेबोला लागून गोलपोस्टमध्ये गेला अन् क्रोएशियाचे गोलचे खाते उघडले. या गोलामुळे क्रोएशियाचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे त्यांनी आक्रमक खेळावर जोर दिला. लुका मॉडरिच आणि इव्हान रॅकिटीच या मधल्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक खेळणार भर दिला. या दोघांवर क्रोएशियाची भिस्त असल्याने त्यांच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष होते.

दुसऱ्या हाफमध्ये मिळालेल्या पेनल्टीचा फायदा घेत मॉडरिचने गोल केला आणि क्रोएशियाला 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. विल्यम ट्रूस्ट डिकाँग हा नायजेरियाच्या खेळाडूने डी मध्ये मारिओ मान्झुकिचला पाडले त्यामुळे क्रोएशियाला पेनल्टी मिळाली मॉडरिचने त्याचे रुपांतर गोलमध्ये केले. विश्वकरंडकात शनिवारी झालेल्या सामन्यांमध्ये अर्जेंटिना आणि पेरू या दोन्ही संघांना पेनल्टीवर गोल करता आला नव्हता. पण, क्रोएशियाच्या मॉडरिचने संधी न दवडता पेनल्टीवर गोल केला. या सामन्यामध्ये क्रोएशियाने आरामात विजय मिळविला. नायजेरियाला आपला खेळ करता आला नाही.  

ड गटामध्ये शनिवारी अर्जेंटिना आणि आइसलँड यांच्यातील सामन्यात बलाढ्य अर्जेंटिना हा सामना जिंकेल असे वाटत असताना पहिल्यांदाच विश्वकरंडकात खेळत असलेल्या आइसलँडने त्यांना बरोबरीत रोखले. आइसलँडने जोरदार खेळ केला. त्यामुळे या ग्रुपमध्ये आता अर्जेंटिनासाठी पुढील दोन सामने महत्त्वाचे असणार आहेत. क्रोएशियाने मिळविलेल्या विजयामुळे अर्जेंटिना या गटात अव्वल राहण्याची शक्यता कमी आहे. 

गेल्या सहा विश्वकरंडकामध्ये सहभागी होत असलेल्या नायजेरियाच्या प्रतिस्पर्धी संघाने जेव्हा पहिला गोल केला आहे. त्यावेळी नायजेरियाला पराभव स्वीकारावा लागला आहे. नायजेरियाचा संघ सहाव्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे. आफ्रिका खंडातून सर्वाधिक विश्वकरंडकात सहभागी होणारा देश म्हणून नायजेरियाची ओळख आहे. विश्वकरंडकात खेळण्याचा एवढा अनुभव असतानाही नायजेरिया संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.


​ ​

संबंधित बातम्या