डिएगो मॅराडोनाच्या साथीनं अर्जेंटिनाला विश्वजेता ठरवणारा मार्गदर्शक कोरोना पॉझिटिव्ह

टीम ई-सकाळ
Sunday, 28 June 2020

१९८६ मध्ये मेक्सिको मध्ये झालेल्या विश्वचषक सामना अर्जेंटिनाने जिंकला होता. या विश्वचषकात डिएगो मॅरेडोनाने अर्जेटिनाच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले होते.

अर्जेंटिना फुटबॉल संघाला १९८६ मध्ये विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक कार्लोस बिलार्डो यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बिलार्डो यांच्यावर राजधानीतील अर्जेंटिना डायग्नोस्टिक रुग्णालयात उपचार सुरू असून, मात्र त्यापूर्वी कोरोनाची कोणतीही लक्षणे त्यांच्यात आढळली नाहीत. ८२ वर्षीय कार्लोस बिलार्डो गेल्या काही दिवसांपासून मेंदूच्या आजाराने ग्रस्त होते. यापूर्वी बिलार्डो राहत असलेल्या नर्सिंग होम मधील इतर १० जणांना  कोरोनाची लागण झाली होती.  बिलार्डो यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, ते यापूर्वी खेळत असलेल्या एस्टुडीनेतेस क्लबने सोशल मीडिया ट्विटरवर, कार्लोस आम्ही या सामन्यात आपल्यासह असल्याचे म्हटले आहे. 

या फुटबॉल लीगने करून दाखवले.. काय ते वाचा 

जुलै २०१९ मध्ये कार्लोस बिलार्डो यांना हकीम-ऍडम्स सिंड्रोम या आजारामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. कार्लोस बिलार्डो यांनी १९८२ पासून ते १९९० पर्यंत अर्जेंटिना संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळली होती. तर १९८६ मध्ये मेक्सिको मध्ये झालेल्या विश्वचषक सामना अर्जेंटिनाने जिंकला होता. या विश्वचषकात डिएगो मॅरेडोनाने अर्जेटिनाच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले होते. आत्तापर्यंत अर्जेंटिना मध्ये ५५ हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला असून, १२०० जणांचा मृत्यू झालेला आहे.    

     

 


​ ​

संबंधित बातम्या