Schoolympics 2019 : महेश विद्यालयाचा सहज विजय 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

सकाळ स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत लॉ कॉलेज मैदानावर झालेल्या सामन्यात महेश विद्यालय संघाने एचडीएफसी प्रशाला संघावर नऊ गडी राखून सहज विजय मिळविला. 

पुणे : सकाळ स्कूलिंपिक क्रिकेट स्पर्धेत लॉ कॉलेज मैदानावर झालेल्या सामन्यात महेश विद्यालय संघाने एचडीएफसी प्रशाला संघावर नऊ गडी राखून सहज विजय मिळविला. 

Schoolympics 2019 : पहिल्याच दिवशी जान्हवीचे दुहेरी यश 

स्पर्धेच्या औपचारिक उद्‌घाटनानंतर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एचडीएफसी संघाला निर्धारित 10 षटकांत 52 धावांचीच मजल मारता आली. महेश विद्यालयाच्या प्रणव खोखर याने 17 धावांत 3 गडी बाद केले. एचडीएफसीचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. आव्हानाचा पाठलाग करताना महेश विद्यालयाने 6 षटकांतच 1 बाद 53 धावा केल्या. वेदांत साठेच्या नाबाद 20 धावांच्या खेळीला गोलंदाजीत चमक दाखविणाऱ्या प्रणव खोखर याने 10 धावा करून सुरेख साथ केली. 

याच मैदानावर झालेल्या अन्य एका सामन्यात ऋत्विक राडे याच्या 37 चेंडूंतील 69 धावांच्या खेळीच्या जोरावर विबग्योर प्रशाला संघाने हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचा 22 धावांनी पराभव केला. हेरिटेज संघाचा डाव 6 बाद 75 असा मर्यादित राहिला. विबग्योरच्या आर्यन राठी याने 2 गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक :
एनसीएल मैदान : शिवनेरी स्कूल, खानापूर 10 षटकांत 5 बाद 96 (श्रेयांश पोहारे 26, सूरज सिंग 22, सुमीत केनगर 2-20) वि.वि. धनीराज स्कूल, वाकड 8 षटकांत सर्वबाद 20 (श्रवण आकरे 3-2). अभिनव विद्यालय इंग्लिश माध्यम, एरंडवणे 10 षटकांत 5 बाद 64 (कूश पाटील 18, लव तोडकर 17, आर्यन चवारिया 3-13) पराभूत वि. फादर एंजल्स विद्यांकुर स्कूल, वडगाव शेरी 7.1 षटकांत 2 बाद 67 (ओम थोरवे 22, आकाश साळवे 13, पार्थ शेवाळे 1-20) 

Schoolympics 2019 : ब्लॉसम, गुरुकुल प्रशाला संघांची विजयी सलामी 

एसएसपीएमएस बोर्डिंग, शिवाजीनगर 10 षटकांत 6 बाद 76 (स्मित राणे 18, यश काळे 14, आदर्श पाटील 2-9) वि.वि. संत तुकाराम इंग्लिश स्कूल, कात्रज 10 षटकांत 4 बाद 48 (सोहम पांडे नाबाद 15, अथर्व ताकवले 3-11) 
लॉ कॉलेज मैदान : एचडीएफसी स्कूल, मगरपट्टा 10 षटकांत 6 बाद 52 (मयूरेश मुरकुंबी 15, रणंजय देशमुख नाबाद 9, प्रणव खोखर 3-17) पराभूत वि. महेश विद्यालय इंग्लिश माध्यम, कोथरूड 6 षटकांत 1 बाद 53 (वेदांत साठे नाबाद 20, प्रणव खोखर नाबाद 10, योहान गंभीर 1-11), विबग्योर स्कूल, बालेवाडी 10 षटकांत 3 बाद 93 (ऋत्विक राडे 69, अनुज वाघ 15, संदेश वाल्हेकर 1-25) वि.वि. हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, मुळशी 10 षटकांत 6 बाद 75 (रुपनंद यादव 22, सार्थक सुतार 22, आर्यन राठी 2-19) 
सनराईज क्रिकेट स्कूल मैदान : न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग 10 षटकांत 4 बाद 97 (समर्थ काळभोर 53, साहिल आभंग 21, हर्षद पोतदार 1-22) वि.वि. लेक्‍सिकॉन स्कूल, हडपसर 10 षटकांत 2 बाद 75 (आदित्यराज गुट्टे नाबाद 46, कुरीचेट्टी विश्‍वेश 10, स्वप्निल जायभाय 1-11), ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल हिंजवडी 10 षटकांत 2 बाद 84 (अक्षत मेखे नाबाद 40, मिलिंद कनोजिया 18, जतिन हेगडे 1-11) वि.वि. पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव 10 षटकांत 5 बाद 59 (स्टिफन नंदिगम 28, वेदांत ठाकूर 3-12), श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, बूगाव 10 षटकांत 5 बाद 102 (वरद काणे 31, अभिराज पाटणकर 21, यश दीक्षित 3-14) वि.वि. सरहद स्कूल, कात्रज 10 षटकांत 8 बाद 30 (वरद काणे 3-6), एंजल हायस्कूल, उरळीकांचन 10 षटकांत 4 बाद 38 (स्वराज जाधव 15, भावेश मखिजिया 9, प्रथम कोतवाल 2-9) पराभूत वि. एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी 2.2 षटकांत बिनबाद 40 (स्वरूप मोरे नाबाद 36, चिन्मय डावरे नाबाद 2)


​ ​

संबंधित बातम्या