कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महेश भूपतीने स्विकारले घरामध्ये राहण्याचे चॅलेंज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

या व्हिडीओमध्ये भूपती टेनिस बॉल सोबत खेळताना दिसत आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, सर्व क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. कोरोना माहामारीचा  फैलाव रोखण्यासाठी भारतात लॉरडाऊनची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे सगळेचा घरामध्ये अडकून पडले आहेत. कोरोना व्हायरस माहामारीच्या काळात आवश्यक असेल तेवढे दिवस घरात राहणार असल्याचे भारताचा माजी टेनिसपटू महेश भूपती याने सांगीतले आहे. कोरोना व्हायरसमुळए जगभरातील सर्व टेनिस स्पर्धा स्थगीत करण्यात आल्या आहेत. 

भूपतीने ट्विटरवरती एक व्हिडीओ पोस्ट करत सांगीतले आहे की, “ मी कोविड-19 च्या काळात गरातच राहत आहे, आणि आवश्यक असेल तेवढे दिवस मी घरातच थांबणार आहे.”  त्याने त्यापुढे तो म्हणाला की यासाठी ‘मी सानिया मिर्झा, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि सायना नेहवाल यांना नॉमिनेट करत आहे.” भूपती स्वतः घरातच थांबत त्याच्या मित्रांनादेखील तसेच करण्याचा विनंती केली आहे. 

 

 

या व्हिडीओमध्ये भूपती टेनिस बॉल सोबत खेळताना दिसत आहे. त्यासाठी त्याने इतर खेळाडूंना आव्हान दिले आहे. कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी भारतात 24 मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे भूपती देखील घरातच  वेळ घालवताना दिसत आहे. भारतात आद्याप 78 हजार पेक्षा जास्त नागरीकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे तर 2500 लोकांनी जीव गमावला आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या