धोनी शून्यावर बाद अन् छोट्या धोनीचा खुर्चीवर राग

वृत्तसंस्था
Wednesday, 19 September 2018

हाँगकाँगने भारताची चांगलीच दमछाक केल्याचे आशिया करंडकाच्या पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाले. भारताने 286 धावा करूनही भारताला फक्त 26 धावांनी विजय मिळविता आला होता.

दुबई : आशिया करंडकात हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी शून्यावर बाद झाल्यानंतर त्याच्या स्टेडियममधील चिमुकल्या चाहत्याने चक्क खुर्चीवरच राग काढला.

हाँगकाँगने भारताची चांगलीच दमछाक केल्याचे आशिया करंडकाच्या पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाले. भारताने 286 धावा करूनही भारताला फक्त 26 धावांनी विजय मिळविता आला होता. या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असलेला धोनी भोपळाही न फोडता बाद झाल्याने चाहत्यांची मोठी निराश झाली होती.

धोनी 41 व्या षटकात खेळायला आल्यानंतर हाँगकाँगचा फिरकीपटू एहसान खान याने त्याला शून्यावर बाद केली. त्यानंतर त्याने खेळपट्टीचे चुंबन घेतले. मात्र, त्याचवेळी स्टेडियममध्ये धोनीची जर्सी घालून आलेल्या एका चिमुकल्याचा संताप कॅमेऱ्यात कैद झाला. त्याने खुर्चीवर राग काढत आक्रोश केला. त्याने धोनीची 7 नंबरची जर्सी घातली होती.

संबंधित बातम्या