हा नशिबाचा खेळ, माझा त्यावर विश्वास : धोनी

वृत्तसंस्था
Tuesday, 25 September 2018

अशी संधी मला परत मिळेल, याचा विचारही केला नव्हता. 199 एकदिवसीय सामन्यांत मी नेतृत्व केले होते. या अनपेक्षित संधीमुळे माझे द्विशतक झाले आहे. हा सर्व नशिबाचा खेळ आहे आणि माझा त्यावर विश्‍वास आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर अशी संधी मिळणे, हे आपल्या हातात नसते. 
- महेंद्रसिंह धोनी 

दुबई : कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर सहसा कोणी पुन्हा कर्णधार होत नसतो; परंतु आपल्या नेतृत्वात नेहमीच अनपेक्षित चाली करण्यात वाक्‌बगार असलेल्या महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा एका सामन्यासाठी देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि योगायोगाने त्याचे एकदिवसीय सामन्यातील कर्णधारपदाचे द्विशतकही साजरे झाले. 

आशिया करंडक स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्‍चित असल्याने आणि दुबईतील प्रचंड उकाड्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार शिखर धवन यांच्यासह प्रमुख वेगवान गोलंदाजांनाही विश्रांती देण्यात आली. या वेळी कर्णधार कोण, असा प्रश्‍न उपस्थित झाला. संघहिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या धोनीने ही जबाबदारी स्वीकारली. जानेवारी 2017 मध्ये धोनीने मर्यादित षटकांचे नेतृत्व सोडले होते. 

अशी संधी मला परत मिळेल, याचा विचारही केला नव्हता. 199 एकदिवसीय सामन्यांत मी नेतृत्व केले होते. या अनपेक्षित संधीमुळे माझे द्विशतक झाले आहे. हा सर्व नशिबाचा खेळ आहे आणि माझा त्यावर विश्‍वास आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर अशी संधी मिळणे, हे आपल्या हातात नसते. 
- महेंद्रसिंह धोनी 

संबंधित बातम्या