धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त नाही होणार

वृत्तसंस्था
Wednesday, 17 July 2019

विश्वकरंडकानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीचा हा अखेरचा विश्वकरंडक होता. त्यानंतर तो निवृत्ती घेणार अशी चर्चा आहे. मात्र, तो निवृत्ती कधी जाहीर करणार हे कोणालाही माहिती नाही. भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये धोनी संघात नसेल आणि तो काही दिवसांत निवृत्त होईल अशी चर्चा आहे. 

मुंबई : भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत विविध चर्चा सुरु असताना आता तो आपला उत्तराधिकारी तयार केल्याशिवाय निवृत्त होणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

विश्वकरंडकानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाल्या आहेत. धोनीचा हा अखेरचा विश्वकरंडक होता. त्यानंतर तो निवृत्ती घेणार अशी चर्चा आहे. मात्र, तो निवृत्ती कधी जाहीर करणार हे कोणालाही माहिती नाही. भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये धोनी संघात नसेल आणि तो काही दिवसांत निवृत्त होईल अशी चर्चा आहे. 

पण, यात काही तथ्य नसून, धोनी इतक्यात निवृत्ती घेणार नाही. त्याआधी त्याला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी रिषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत रिषभ पंत सेट होत नाही तोपर्यंत धोनी संघात असेल. दरम्यान धोनी संघासोबत राहून पंतला मार्गदर्शन करेल. पुढील विश्वकरंडकापर्यंत रिषभला तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.

​ ​

संबंधित बातम्या