धोनीचे 'टी-20'मध्ये त्रिशतक 

वृत्तसंस्था
Sunday, 10 February 2019

सर्वाधिक टी-20 खेळणारे भारतीय 
महेंद्रसिंह धोनी 300 (आंतरराष्ट्रीय 96 सामने 1,548 धावा, 2 अर्धशतके) 
269 डाव 38.35 सरासरी 135.96 स्ट्राइक रेट, 6,136 धावा 24 अर्धशतके 
रोहित शर्मा 298 
सुरेश रैना 296 
दिनेश कार्तिक 260 

हॅमिल्टन (न्यूझीलंड) : भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याने रविवारी आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवताना टी-20 क्रिकेटमध्ये तीनशेवा सामना खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान मिळविला. 

टी-20 क्रिकेटमध्ये तीनशे किंवा त्याहून अधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये धोनी बारावा क्रिकेटपटू ठरला. सर्वाधिक 446 टी 20 सामने वेस्ट इंडीजच्या किएरॉन पोलार्डच्या नावावर आहेत. 

धोनीनंतर भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 298 सामने खेळले आहेत. पोलार्डने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक टी-20 सामने खेळताना 29.97च्या सरासरीने 1 शतक, 43 अर्धशतकांसह 8,752 धावा केल्या आहेत. पोलार्ड या सर्वाधिक सामन्यात आंतरराष्ट्रीय सामने केवळ 59 खेळला असून, यात त्याच्या 788 धावाच आहेत. 

सर्वाधिक टी-20 खेळणारे भारतीय 
महेंद्रसिंह धोनी 300 (आंतरराष्ट्रीय 96 सामने 1,548 धावा, 2 अर्धशतके) 
269 डाव 38.35 सरासरी 135.96 स्ट्राइक रेट, 6,136 धावा 24 अर्धशतके 
रोहित शर्मा 298 
सुरेश रैना 296 
दिनेश कार्तिक 260 

संबंधित बातम्या