'फिनिशर' धोनी अखेर 'फिनिश' करण्यात यशस्वी

टीम ई सकाळ
Tuesday, 15 January 2019

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना धोनीला मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून देण्याची संधी होती. त्याने अर्धशतकी खेळी केलीही पण त्याच्या संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भारताला हा सामनाही गमवावा लागला होता.

ऍडलेड : फिनिशर अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीला अखेर काही वर्षांनंतर आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली असून, धोनीने अर्धशतकी खेळी करत भारताला ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना धोनीला मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून देण्याची संधी होती. त्याने अर्धशतकी खेळी केलीही पण त्याच्या संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भारताला हा सामनाही गमवावा लागला होता. मात्र, आज धोनीने जबाबदारीने फलंदाजी करत अखेरपर्यंत किल्ला लढविला आणि भारताला विजय मिळवून दिला. त्याला दिनेश कार्तिकने चांगली साथ दिली. धोनीने आपल्या स्टाईलमध्ये षटकार खेचत विजयाजवळ नेले. अर्थात या विजयात मोलाचा वाटा होता तो कर्णधार विराट कोहलीचा.
 
कसोटी क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर भारताने काही यष्टिरक्षकांना संधी दिली. एकदिवसीय क्रिकेट आणि ट्वेंटी-२० मध्येही काही प्रयोग करण्यात आले. पण यष्टिरक्षणाच्या बाबतीत धोनीचा हात धरू शकणारा कुणीही अद्याप भारताला मिळालेला नाही, हेही सत्य आहे. पण यष्टिरक्षणात 'दादा' असलेला धोनी फलंदाजीत मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी ठरत होता. एकेकाळी धोनी हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर होता. त्यामुळे तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकत असे. आता हेच करताना धोनी पुन्हा एकदा दिसला.

गेल्या वर्षभरामध्ये धोनीने एकूण 22 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये 57 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आगामी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात धोनीच यष्टीरक्षक असेल हे जवळपास स्पष्ट आहे.


​ ​

संबंधित बातम्या