महेंद्र सिंग धोनी हा शांत व संयमी खेळाडू - मायकल हसी

टीम ई-सकाळ
Wednesday, 15 July 2020

मायकल हसीने रिकी पाँटिंग व महेंद्र सिंग धोनी यांच्यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल सांगताना, रोहित शर्मा दडपणाखाली आणि शांतपणेही बोलका असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या क्रिकेट संघातील यशस्वी कर्णधारांविषयी बोलताना कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्र सिंग धोनी यांची नावे समोर येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील महेंद्र सिंग धोनीची तुलना अन्य संघांच्या यशस्वी कर्णधारांसोबत नेहमीच केली जाते. आता यावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीने महेंद्र सिंग धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांची तुलना केली आहे. महेंद्र सिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे नेतृत्व धोनीप्रमाणेच उत्तम केले आहे. मात्र अजून देखील क्रिकेटचे चाहते महेंद्र सिंग धोनीला भारतीय संघाच्या कर्णधारपदी पाहण्यासाठी उत्सुक असतात. 

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे      

मायकल हसीने चेतन नरुलाबरोबर केलेल्या संवादात, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग हा खूप स्पर्धात्मक असल्याचे म्हणत, रिकी पॉन्टिंग संघाच्या विजयासाठी इतर सहकारी खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत खेचून नेत असल्याचे सांगितले. तर महेंद्र सिंग धोनीकडे खेळातील उत्तम अंतर्ज्ञान असल्याचे मायकल हसीने म्हटले असून, धोनी हा शांत व संयमी खेळाडू असल्याचे सांगितले. तसेच संघाच्या कोणत्याही परिस्थितीत धोनी खेळाडूंचा पाठपुरावा करत, त्यांच्यावर कठीण काळात विश्वास दाखवत असल्याचा खुलासा मायकल हसीने केला. तसेच संघाला येणाऱ्या यश आणि अपयशासंदर्भात बोलताना मायकल हसीने रिकी पॉन्टिंग आणि एमएस धोनी या दोघांचीही प्रतिक्रिया समान असल्याचे सांगितले. खेळादरम्यान रिकी पाँटिंगने शतकी खेळी साकारली अथवा शून्यावर बाद झाला तरी त्याच्यात कोणताच बदल होत नसल्याचे हसी या संवादादरम्यान म्हणाला. धोनी देखील याप्रमाणेच असल्याचे हसीने नमूद केले. 

ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2000 च्या दशकात पॉन्टिंग कर्णधारपदी असताना दोन एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तर महेंद्र सिंग धोनी हा खेळाच्या इतिहासातील एकमेव कर्णधार राहिला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या सर्व स्पर्धांचे विजेतेपद भारताने जिंकले आहेत. 2011 मध्ये महेंद्र सिंग धोनी कर्णधारपदी असताना भारताने एकदिवसीय सामन्यातील विश्वचषक आपल्या खिशात घातला होता. तसेच महेंद्र सिंग धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी20 सामन्यांच्या विश्वचषकावर व 2013 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी वर आपले नाव कोरले होते. 

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात उद्या रंगणार दुसरा कसोटी सामना  

तसेच मायकल हसीने रिकी पाँटिंग व महेंद्र सिंग धोनी यांच्यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल सांगताना, रोहित शर्मा दडपणाखाली आणि शांतपणेही बोलका असल्याचे म्हटले आहे. पण या तिघांकडेही इतर खेळाडूंवर दबाव आणण्याची चांगली क्षमता असल्याचे हसीने सांगितले. मायकल हसी 2014 मधील आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला होता. तर त्यापूर्वी 2008 ते 13 च्या दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघातून आयपीएल मध्ये सहभाग नोंदवला होता.              

 


​ ​

संबंधित बातम्या