बलाढ्य महाराष्ट्राचे दुहेरी यश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

-सहाराष्ट्राचे अपेक्षित यश

-मिश्र सांघिक गटातील ज्युनियर व सीनियर गटात बाजी मारली.

-महाराष्ट्राने ज्युनियर गटात गुजरातचा कडवा प्रतिकार ३-२ फरकाने मोडीत काढला.

-सीनियर गटातील अंतिम लढत त्यांच्यासाठी एकतर्फी ठरली. त्यांनी मध्य प्रदेशला ३-० फरकाने नमविले.

पणजी बलाढ्य महाराष्ट्राने पश्चिम विभाग बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश साकारले. त्यांनी अनुक्रमे मिश्र सांघिक गटातील ज्युनियर व सीनियर गटात बाजी मारली. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात झाली.

महाराष्ट्राने ज्युनियर गटात गुजरातचा कडवा प्रतिकार ३-२ फरकाने मोडीत काढला. सीनियर गटातील अंतिम लढत त्यांच्यासाठी एकतर्फी ठरली. त्यांनी मध्य प्रदेशला ३-० फरकाने नमविले. ज्युनियर गटात गोवा आणि मध्य प्रदेशला ब्राँझ, तर सीनियर गटात छत्तीसगड व गुजरातला ब्राँझपदक मिळाले.

बक्षीस वितरण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे निरीक्षक मयूर पारीख, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर, खजिनदार सर्फराज शेख यांच्या उपस्थितीत झाले.

अंतिम निकाल

ज्युनियर मिश्र सांघिक  महाराष्ट्र वि. वि. गुजरात ३-२ रोहन थूल पराभूत वि. अनिरुद्धसिंह कुशवाहा १४-२१, १७-२१. तारा शाह वि. वि. श्रेया लेले २१-१२, २१-१३. हर्षल जाधव व यश शाह पराभूत वि. अनिरुद्धसिंह कुशवाहा व भाविन करमचंदानी १५-२१, २१-१८, १७-२१. रितिका ठाकर व सिमरन सिंघी वि. वि. जान्हवी खन्ना व नुपूर वासावडा २१-१९, २१-८. रोहन थूल व सिमरन सिंघी वि. वि. कुणाल सोकार व युती गज्जर २१-१४, २१-१५.

सीनियर मिश्र सांघिक महाराष्ट्र वि. वि. मध्य प्रदेश ३-० : कौशल धर्मामेर वि. वि. प्रियांशू राजावत २१-१२, २१-१४. वैदेही चौधरी वि. वि. मिहिका भार्गव २१-८, २१-१०. दीप रामभैया व विग्नेश देवळेकर वि. वि. पियुष बोबडे व शुभम प्रजापती २१-१७, २-१३.


​ ​

संबंधित बातम्या