राज्य तलवारबाजी संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी संघाची घोषणा केली. या संघाचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण नुकतेच छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात संपन्न झाले.

सातारा : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आतंरशालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या 19 वर्षाखालील मुलांचा आणि मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

नाईक यांनी जाहीर केलेल्या संघात मुलांत फॉईल प्रकारात ः जय खंडेलवाल (रुस्तमजी ज्युनिअर कॉलेज, मुंबई), जयदीप पांढरे (वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबाद), भुनेश नागोसे (जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भंडारा), प्रतिम देशमुख (शिवछत्रपती कॉलेज, औरंगाबाद).

ईपी प्रकारात ः महेश कोरडे (श्री स्वामी रामदास ज्युनिअर कॉलेज, औरंगाबाद), अभिषेक देशमुख (अपेक्‍स ज्युनिअर कॉलेज, औरंगाबाद), आदित्य राठोड (एच.आर.कॉलेज, चर्चेगट, मुंबई).

राजकुमार सोमवंशी प्रशिक्षक

सेबर प्रकारात अभय शिंदे (माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोरंगाव, औरंगाबाद), प्रितम हलदार (लाल बहादूर शास्त्री ज्युनिअर कॉलेज, भंडारा), प्रथमेश तुपे (अपेक्‍स ज्युनिअर कॉलेज, औरंगाबाद), शिवा सुब्रमण्यम (एस.आय.ई.एस.कॉलेज ऑफ आर्टस, सायन, मुंबई) यांचा समावेश आहे.
या संघाच्या प्रशिक्षकपदी राजकुमार सोमवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
स्वप्नील तांगडे प्रशिक्षक

मुलींत फाईल व ईपी प्रकारात अन्यया जोशी (एल.जी.आर. पुरोहित कन्या विद्यालय, सांगली), फाईल प्रकारात खूशी दुखांडे ((रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुंबई), विशाखा काजळे (शिवछत्रपती कॉलेज, औरंगाबाद), प्रिती टेकाळे (एस.बी.एस. कॉलेज, औरंगाबाद).

ईपी प्रकारात ः ज्ञानेश्‍वरी शिंदे (महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर), श्रेया आहेर (के.टी.एच.एम.कॉलेज, नाशिक), देव्यानी नंदागवळी (डॉ. आंबेडकर कॉलेज, नागपूर). सेबर प्रकारात ः श्‍लोका शिंदे (विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर), सानिका मोरे (विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर), सायली नंदागवळी (लाल बहादूर शास्त्री ज्युनिअर कॉलेज, भंडारा), प्राजक्ता मोरे (राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर).
 
या संघाच्या प्रशिक्षकपदी स्वप्नील तांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुलांच्या आणि मुलींच्या संघ व्यवस्थापकपदी चंद्रकांत भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 

दुबईतील खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत गायत्री, हिमांशूचे यश

सातारा ः दुबई येथे नुकत्याच झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत येथील पेरेन्टस असोसिएशन इंग्लिश मीडियम स्कूलमधील गायत्री आणि हिमांशू कुचेकर यांनी उज्ज्वल यश मिळविले.

या स्पर्धेत गायत्री हिने 17 वर्षांखालील गटात ब्रिटनच्या लिओवर 17-21, 21-15, 21-18 असा विजय मिळविला. मुलांच्या 15 वर्षांखालील गटात हिमांशूने दुबईच्या विष्णू डी. यांस 21-14, 21-17 असे नमविले. स्पर्धेत मिश्र दुहेरीत गायत्री व हिमांशूने प्रतिस्पर्धींना 16-21, 21-18, 21-17 असे हरविले. यशस्वितांना तिमिअर अरवारे तसेच अभिषेक मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.


​ ​

संबंधित बातम्या