संतोष ट्रॉफी : देखो कौन आय सोलापूर का शेर आया..!

अलताफ कडकाले
Wednesday, 13 February 2019

महाराष्ट्र आणि गुजरातचा सामना सुरू असताना मूळचा सोलापुरातील असलेला महाराष्ट्र संघातून खेळणारा ओंकार मस्के जेव्हा खेळण्यास मैदानात उतरला तेव्हा पार्क मैदान ओंकारच्या जयघोषाने दणाणून गेले होते. आजचा सामना पाहण्यास शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.

संतोष ट्रॉफी 2019 : सोलापूर : देखो देखो कौन आया... सोलापूर का शेर आया... ओंकार तूम आगे बढो... हम तुम्हारे साथ है ओंकार  ओंकार अशा घोषणा देऊन फुटबॉलप्रेमींनी ओंकार मस्केला आज प्रोत्साहन दिले. सामन्यातील उत्तरार्धात सोलापूरचा फुटबॉलपटू ओंकार मस्के मैदानात उतरल्यानंतर एकच जल्लोष झाला. 

महाराष्ट्र आणि गुजरातचा सामना सुरू असताना मूळचा सोलापुरातील असलेला महाराष्ट्र संघातून खेळणारा ओंकार मस्के जेव्हा खेळण्यास मैदानात उतरला तेव्हा पार्क मैदान ओंकारच्या जयघोषाने दणाणून गेले होते. आजचा सामना पाहण्यास शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.

महाराष्ट्राचा सामना असल्याने साहाजिकच गर्दी होती. संपूर्ण सामना संपेपर्यंत ओंकारच्या नावाची घोषणा सुरू होती. खरेतर सामन्याच्या उत्तरार्धात ओंकार सामन्यात खेळण्यास मैदानात उतरला होता. परंतु, प्रेक्षकांत सुरवातीपासूनच उत्साह दिसत होता. ओंकारने सराव सुरू केला तेव्हा प्रेक्षकांना कळले की ओंकार आता मैदानात उतरणार आहे. यावेळी ओंकार.. ओंकार अशा घोषणा मोठ्याने देत होते. चेंडू त्याच्याकडे यायचा तेव्हा संपूर्ण स्टेडियम घोषणेने दणाणून जायचे. 

चारपेक्षा जास्त गोल होतील अशी अपेक्षा होती : आय. वाझ 
आमच्या संघाला येथील मैदानामुळे फरक पडला. कारण, महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर मुंबईत झाले. तेथे फुटबॉलसाठी खास हिरवळीचे मैदान आहे. त्यामुळे येथे संघाला खेळताना सुरवातीला थोडी अडचण आली. नंतर संघाने चांगली सुरवात केल्याने मी समाधानी असल्याचे मत वरिष्ठ प्रशिक्षक आय. वाझ यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

आज गुजरातबरोबरच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने 4-1ने गट "ब'मधून बढत घेतली आहे. सामन्यानंतर आय. वाझ बोलत होते.

ते म्हणाले, "चारपेक्षा जास्त गोल होण्याची अपेक्षा होती. परंतु, या सामन्यात संघाला सेट होण्यास वेळ लागला. संघाने ठरवलेली रणनीती तंतोतंत मैदानावर उतरवली. महाराष्ट्राच्या संघाने दोन वर्षे अंतिम तर चार वेळा उपांत्य सामना खेळला आहे. याचा आमच्या खेळाडूंना अनुभव आहे. सोलापूरचा ओंकार मस्के चांगला खेळाडू असून तो मैदानात उत्तम खेळतो. परंतु, त्याला मोठ्या संघाबरोबर खेळण्याचा अनुभव कमी आहे. तो आता महाराष्ट्राच्या संघात आला असून सरावात तो समरस झाला आहे. पुढे तो चांगला खेळ करेल असे मला वाटते. डॉ. किरण चौगुले यांनी मोठ्या प्रयत्नाने सोलापुरात एवढी मोठी स्पर्धा आणल्याने त्यांचे कौतुकच करावे. फुटबॉलमध्ये सोलापूरच्या युवकांनी रुची दाखवावी. यानिमित्त फुटबॉलचे वातावरण सोलापुरात तयार झाले आहे. याचा फायदा युवकांनी घ्यावा.''


​ ​

संबंधित बातम्या