Khelo India : बॉक्सिंग रिंगमध्ये महाराष्ट्राचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 January 2019

पुणे : खेलो इंडिया 2019 अंतर्गत सुरू असलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी आपला दबदबा राखला. महाराष्ट्राच्या सात मुली आणि 18 मुलांनी अंतिम फेरीत प्रवेश करतात आपल्या मनगटातील जोर दाखवून दिला.

बॉक्सिंगमध्ये यश मिळविणार्या खेळाडूंत देविका घोरपडे हिचे यश कौतुकास्पद ठरले. तिने 17 वर्षांखालील मुलींच्या गटात 46 किलो वजन प्रकारामध्ये हरियाणाच्या रिंकुला आपल्या जबरदस्त ठोशांनी निष्प्रभ केले. याचा वयोगटातील 54 किलो वजन प्रकारात महाराष्ट्राच्या येईपाबा मेइतिने पंजाबच्या अविनाश जंबवालला गुणांवरच पराभूत करताना अंतिम फेरी गाठली.

याशिवाय सी. विश्वामित्र, सेखोंसिंग यांनी देखिल सर्वेात्तम खेळाचे प्रदर्शन करताना आपापल्या वजन गटातून अंतिम फेरी गाठली. आघाडीची बॉक्सर मिथिका गुणेले हिने केरळच्या अलिशा सनी हिला  60 किलो वजन प्रकारात सहज हरवले.

पुण्याचा आकाश अंतिम फेरीत
प्रतिकूल परिस्थितीत आपली बॉक्सिंग कारकिर्द घडविणार्या पुण्याच्या आकाश गुरखाने देखील घरचे मैदान गाजविताना अंतिम फेरी गाठली. त्याने 17 वर्षांखालील 57 किलो गटाची अंतिम फेरी गाठताना हरियानाच्या अमन दुहानची घोडदौड रोखली.

महाराष्ट्राचे खेळाडू आगेकूच करत असताना लक्ष्मी पाटील हिला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. तिला मणिपूरच्या तींगमिला डोंगील हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. अर्थात उपांत्य फेरीत हरल्याने ती ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. 17 वर्षांखालील 60 किलो वजन प्रकारात सना गोंन्सालविसला देखील उपांत्य  फेरीतील पराभवामुळे ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.

​ ​

संबंधित बातम्या