बहिणीबरोबरच्या लग्नामुळे 'तो' खेळाडू संघाबाहेर

वृत्तसंस्था
Monday, 9 December 2019

माझ्या बहिणीबरोबर त्याचे लग्न झाले आहे, त्यामुळे तो आज खेळत नाही, हे कर्णधाराने सांगताच प्रतिस्पर्धी संघांनाच नव्हे तर मैदानावरील उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केलेल्या फाफ डू प्लेसिसच्या वक्तव्याने सर्वच चकित झाले होते.

डर्बन : माझ्या बहिणीबरोबर त्याचे लग्न झाले आहे, त्यामुळे तो आज खेळत नाही, हे कर्णधाराने सांगताच प्रतिस्पर्धी संघांनाच नव्हे तर मैदानावरील उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केलेल्या फाफ डू प्लेसिसच्या वक्तव्याने सर्वच चकित झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

Image result for faf du plessis sister

माझनानी सुपर लीग स्पर्धेत पार्ल रॉक आणि नेल्सन मंडेला जायंटस्‌ बे संघात लढत होती. लढतीपूर्वीच्या नाणेफेकीच्यावेळी पार्ल रॉक संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याला संघातील बदलाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने संघात एक बदल आहे. हार्डस विलोएन या संघात नाही. माझ्या बहिणीबरोबर त्याचे कालच लग्न झाले आहे, असे फाफ डू प्लेसिसने सांगताच टीव्ही संचालकास पुढील प्रश्‍नच सुचले नाहीत. 

फाफ डू प्लेसिसची बहीण रेमी रिनर्स आणि हार्डस विलोएन यांचे लग्न काही महिन्यांपूर्वीच ठरले होते. विलोएन हा आतापर्यंत एकच कसोटी खेळला आहे, पण तो विविध देशांतील व्यावसायिक लीगमध्ये सातत्याने खेळत आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आगामी मोसमासाठी आपल्याकडेच राखले आहे.


​ ​

संबंधित बातम्या