छोट्याशा क्रोएशियाचा जागतिक सुपरस्टार

प्रितम पुरोहीत
Thursday, 6 December 2018

क्रोएशिया एक छोटासा देश आणि तो नुकताच फुटबॉलमुळे लक्षात राहिला. त्या देशाने पुढे सुद्धा लक्षात राहिल अशीच कामगिरी बजावली आहे. फुटबॉलमध्ये दिला जाणारा मानाचा पुरस्कार मिळवला क्रोएशियाच्या लुका मॉड्रिच याने...  

क्रोएशिया एक छोटासा देश आणि तो नुकताच फुटबॉलमुळे लक्षात राहिला. त्या देशाने पुढे सुद्धा लक्षात राहिल अशीच कामगिरी बजावली आहे. फुटबॉलमध्ये दिला जाणारा मानाचा पुरस्कार मिळवला क्रोएशियाच्या लुका मॉड्रिच याने...  

हा देश पहिल्या महायुद्धाच्या झळा सहन करत आज इथवर पोहोचला आहे. पहिल्यांदा फ्रान्समध्ये झालेल्या फुटबॉल विश्वकरंडकात पदार्पणातच तिसऱ्या स्थानावर मजल मारली. प्रगतीच्या काळाची किक मारली ते साल होत 1998. त्यापूर्वी क्रोएशिया संघातील अनेक खेळाडूंनी 1990-195 पर्यंत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या झळा सोसल्या..! 

क्रोएशियाच्या मध्यात असलेले त्याचे गाव मॉड्रिची हे नागरी युद्धात होरपळले जात होते. लोक गाव, शहर सोडुन जातं होते. सर्बियाच्या सैन्याने लुकाचे घर जाळून टाकले तेव्हा लुकाचे वय अवघ सहा वर्षे होते. हवेतून होणारा ग्रेनाईडचा मारा, चारही बाजूंनी सतत होणारा गोळीबार, या सगळ्यांतून दूर जाण्यासाठी मॉड्रिच फुटबॉल खेळू लागला. जर्मनी आणि स्विर्त्झलंडमध्ये बालपण गेले. सोमवारी रात्री झालेल्या बॉलन द ऑर 2018 पुरस्काराने लुका मॉड्रिचला सन्मानित करण्यात आले. वयाच्या 33व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे.

"मला वाटतं आज फुटबॉलसाठी हा विजय आहे." मी आनंदित आहे की मी विजेता आहे, परंतु हा पुरस्कारही या सर्व खेळाडूंसाठी देखील आहे ज्याला कदाचित विजय मिळविण्याकरिता आला नाही. हे माझ्या साठी खूप विशेष आहे. मला आता या क्षणाला काय वाटतंय माझ्या भावना मला शब्दात वर्णन करता येणार नाहीत.''

रोनाल्डो आणि मेस्सी हे अभूतपूर्व खेळाडू आहेत. हे वर्षे माझ्या साठी खूप खास आहे. जिंकण्यासाठी मी खेळपट्टीवर काहीतरी विशेष केले. 
- लुका मॉड्रीच (रिअल माद्रिद आणि क्रोएशिया)

आतापर्यंत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याकडे बॉलन डी ओर पुरस्कार मिळवले आहेत. मात्र यावेळी लुकाला हा पुरस्कार मिळाला.. आता येणार 2019 मधील पुरस्कारावर कोणाची वर्णी लागणार? 5-5 अशी बरोबरी असणारे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या पैकी कोण बाजी मारणार? हे पाहणे फूटबॉल प्रेमींसाठी उत्सुकता असणार आहे. 10 वर्ष या पुरस्कार वर त्यांचं अधिराज्य होत. या हंगामात रोनाल्डोचे 11 गोल 18 सामन्यात होते तर मेस्सी ने 15 सामन्यात 15 गोल केले आहेत. आगामी 2019 वर्षांत किती गोल करायचें याची गणिते आखण्यास सुरुवात केली असेल तर यात काही नवल वाटायला नको...!

काय आहे बॉलन द ऑर...!
हा एक फुटबॉल खेळातील महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार1956 पासून युरोपियन क्लब मधल्या फुटबॉल खेळाडूंना दिला जायचा. या पुरस्काराचा पहिला मानकरी इंग्लंडचा स्टेनली मॅथ्यूस ठरला.! 1995 पर्यंत युरोपियन क्लब मर्यादित न राहता त्या व्यतिरिक्त फुटबॉल क्लब खेळाडूसाठी देण्याचे ठरलं..! त्या प्रमाणे झालं सुद्धा..! मात्र 2007 जगभरातील फुटबॉल खेळाडूंना देण्याचे ठरलं.! 

2007 ते 2018 चे पाहिले तीन पुरस्काराचे मानकरी

2007- काका 
ख्रिस्तियानो रोनाल्डो 
लिओनेल मेस्सी

2008- ख्रिस्तियानो रोनाल्डो 
लिओनेल मेस्सी 
फर्नांडो टॉरेस

2009-लियोनेल मेसी 
ख्रिस्तियानो रोनाल्डो 
झॅवी

2010- लिओनेल मेसी 
अँडीस इनिएस्टा 
झॅवी

2011- लिओनेल मेसी
ख्रिस्तियानो रोनाल्डो 
झॅवी

2012 - लिओनेल मेस्सी 
ख्रिस्तियानो रोनाल्डो 
अँडिस इनिएस्टा

2013- ख्रिस्तियानो रोनाल्डो 
लिओनेल मेस्सी 
फ्रँक रिबरी

2014- ख्रिस्तियानो रोनाल्डो 
लिओनेल मेस्सी 
मॅन्युएल न्येअर

2015- लियोनेल मेस्सी 
ख्रिस्तियानो रोनाल्डो 
नेमार

2016- ख्रिस्तियानो रोनाल्डो
लिओनेल मेसी 
अँटोईन ग्रिझमन

2017- ख्रिस्तियानो रोनाल्डो 
लिओनेल मेस्सी 
नेमार

2018- मॉड्रीच
ख्रिस्तियानो रोनाल्डो 
अँटोईन ग्रिझमन
 

उत्कृष्ट 10
1. लुका माँड्रिच (रिअल माद्रिद आणि क्रोएशिया)
2. ख्रिस्तियानो रोनाल्डो (ज्यूव्हेटस आणि पोर्तुगाल)
3. अँटोईन ग्रिझमन (अॅटलेटिक माद्रिद आणि फ्रान्स)
4. कैलीनियन मेपप्पी (पॅरिस सेंट-जैनमिन आणि फ्रान्स) 
5. लियोनेल मेस्सी (बार्सिलोना आणि अर्जेंटिना)
6. मोहम्मद सलाह (लिव्हरपूल आणि इजिप्त)
7. राफेल व्हेरा (रिअल माद्रीद आणि फ्रान्स)
8. एडन धोका आणि चेल्फ (चेल्सी आणि बेल्जियम)
9. केविन डी ब्रुने (मँचेस्टर सिटी आणि बेल्जियम)
10. हॅरी केन (टेन्टेनहॅम आणि इंग्लंड).


​ ​

संबंधित बातम्या