रोनाल्डो, मेस्सीचे वर्चस्व झुगारत मॉड्रीच ठरला सर्वोत्तम

वृत्तसंस्था
Tuesday, 25 September 2018

रोनाल्डो आणि मेस्सी यांचे वर्चस्व झुगारत क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीच याने यंदाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच ब्राझीलची कर्णधार मार्टा हीने सहाव्यांदा फिफा सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. 

लंडन : गेली दहा वर्षे फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर वर्चस्व गाजविणारे रोनाल्डो आणि मेस्सी यांचे वर्चस्व झुगारत क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीच याने यंदाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच ब्राझीलची कर्णधार मार्टा हीने सहाव्यांदा फिफा सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. 

यंदाच्या फिफा सर्वोत्तम खेळेडूच्या स्पर्धेत क्रोएशियाचा लुका मॉड्रीच, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि इजिप्तचा महंमद सलाह हे खेळाडू होते. 2008 ते 2017 या कालावधीत रोनाल्डो आणि मेस्सी यांनी प्रत्येकी पाचवेळा हा पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला दहा वर्षांत प्रथमच अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान पटकावता आले नाही. त्यामुळे रोनाल्डोचे पारडे जड वाटत असतानाच मॉड्रीचने बाजी मारली. 

फिफा सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारापूर्वी मॉड्रीचने फुटबॉल विश्वकरंडकात गोल्डन बॉल आणि युरोपियन सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. एकाच वर्षात हे तिन्ही पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. तसेच यावर्षी फुटबॉल विश्वकरंडकात झालेल्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया अंतिम सामन्यात बाजी मारणाऱ्या फ्रान्सचे मार्गदर्शक देशचॅम्प यांनी फिफाचा सर्वोत्तम मार्गदर्शक पुरस्कार पटकावला.

Didier Deschamps

संबंधित बातम्या