सुआरेझ, मेस्सीचे दोन मिनिटांत दोन गोल

वृत्तसंस्था
Sunday, 7 April 2019

करीम बेन्झेमा मदतीला
करीम बेन्झेमाच्या गोलमुळे रेयाल माद्रिदने तळात असलेल्या हुएस्काचा 3-2 असा पराभव केला. झिदान यांना पुन्हा विजयापासून वंचित राहावे लागणार, असे वाटत असतानाच बेन्झेमाने अखेरच्या मिनिटास गोल केला. झिदान यांचा मुलगा लुका याच्या चुकीमुळे रेयालला स्वयंगोल स्वीकारावा लागला होता. दरम्यान, या विजयामुळे रेयाल माद्रिदच्या दुसऱ्या क्रमांक मिळवण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

बार्सिलोना : लुईस सुआरेझ आणि लिओनेल मेस्सी यांनी दोन मिनिटांत दोन गोल केले; त्यामुळे बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉलमध्ये ऍटलेटीको माद्रिदचे आव्हान परतवले. या विजयामुळे बार्सिलोनाने ला लिगा विजेतेपदाच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावरील ऍटलेटीकोस 11 गुणांनी मागे टाकले आहे.

या महत्त्वाच्या लढतीत ऍटलेटीकोचा अव्वल खेळाडू दिएगो कोस्टा याला पंचांचा अवमान केल्याबद्दल मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर जवळपास एक तास ऍटलेटीकोने बार्सिलोनास गोलपासून रोखले होते; पण सुआरेझने 85 व्या आणि मेस्सीने 86 व्या मिनिटास गोल करीत बार्सिलोनास विजयी केले. या पराभवामुळे ऍटलेटीकोच्या बार्सिलोनास मागे टाकण्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत.
हा विजय खूपच मोलाचा असल्याचे बार्सिलोनाचे मार्गदर्शक एरनेस्टो वॅलवेर्दे यांनी सांगितले; तर आम्ही विजेतेपदाच्या दिशेने एक नव्हे; तर दोन भक्कम पावले टाकली आहेत, असे सुआरेझ म्हणाला. स्पॅनिश लीग विजेतेपद निश्‍चित असल्यामुळे आता बार्सिलोना चॅंपियन्स लीग स्पर्धेवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकेल.

करीम बेन्झेमा मदतीला
करीम बेन्झेमाच्या गोलमुळे रेयाल माद्रिदने तळात असलेल्या हुएस्काचा 3-2 असा पराभव केला. झिदान यांना पुन्हा विजयापासून वंचित राहावे लागणार, असे वाटत असतानाच बेन्झेमाने अखेरच्या मिनिटास गोल केला. झिदान यांचा मुलगा लुका याच्या चुकीमुळे रेयालला स्वयंगोल स्वीकारावा लागला होता. दरम्यान, या विजयामुळे रेयाल माद्रिदच्या दुसऱ्या क्रमांक मिळवण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

युव्हेंटिस जेतेपदाच्या नजीक
युव्हेंटिस सलग आठव्या सिरी ए विजेतेपदाच्या अगदी नजीक आहेत. त्यांनी सुरवातीच्या पिछाडीनंतर एसी मिलानचा 2-1 असा पराभव केला. या विजयामुळे युव्हेंटिसने अन्य संघांना किमान 21 गुणांनी मागे टाकले आहे. नापोली रविवारी उशिरा होणाऱ्या लढतीत पराजित झाल्यास युव्हेंटिसचे विजेतेपद सात लढती शिल्लक असतानाच निश्‍चित होईल.

लेवांडोवस्कीचा दोनशेवा गोल
म्युनिच ः बायर्न म्युनिचने डॉर्टमंडचा 5-0 असा पराभव करीत जर्मन लीगमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. रॉबर्ट लेवांडोवस्कीच्या दोनशेवा गोल हे बायर्नच्या विजयाचे वैशिष्ट्य. या लढतीपूर्वी डॉर्टमंडने बायर्नला दोन गुणांनी मागे टाकले होते; पण बायर्नने सहज बाजी मारली. त्यांनी आम्हाला चांगलाच धडा शिकवला, अशी कबुली डॉर्टमंडचे मार्गदर्शक ल्युसियन फॅवरे यांनी दिली.

मॅंचेस्टर सिटी अंतिम फेरीत
लंडन ः मॅंचेस्टर सिटीने ब्रायटनचे कडवे आव्हान 1-0 असे परतवत एफए कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे मोसमातील चार विजेतेपदाच्या सिटीच्या आशा कायम आहेत. मात्र हे अवघडच असल्याचे सिटीचे व्यवस्थापक पेप गॉर्डिओला यांनी सांगितले. सिटी सध्या प्रीमियर लीगमध्ये दुसरे आहेत; पण ते आघाडीवरील लिव्हरपूलपेक्षा एक सामना कमी खेळले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या