आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहे स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

कोरोनाचा धोका संपल्यानंतरच आयपीएलचे आयोजन करणे योग्य राहिल

कोरोना व्हायरस माहामारीच्या काळाच जगभरात क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी क्रीडा संगटना प्रयत्न करताना दिसत आहेत. काही देशांनी खेळाडूंना काही अटींवर सराव करण्याची परवानगी दिली आहे. भारतात केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील क्रीडा मैदाणे सरावसाठी खुली करण्याची परवाणगी दिली आहे. कोरोनाचा धोका संपल्यानंतरच आयपीएलचे आयोजन करणे योग्य राहिल तसेच आय़पीएल स्पर्धेचा फायदा या वर्षी ऑस्ट्रेलिया मध्ये यावर्षी होणाऱ्या टी20 विश्वकप स्पर्धेच्या तयारीसाठी फायदा होईल असे मत ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज पॅट कमिन्स यांने व्यक्त केले आहे. 

कमिन्स हा इंडीयन प्रिमीअर लीग मधील सर्वात महागडा खेळाडू आहे त्याला कोलकता नाईट रायडर्सने 15 कोटी 50 लाख रुपये किंमतीत खरेदी केले आहे. आयपीएल स्पर्धेबद्दल तो आशावादी असल्याचे सांगीतले आहे. “ मी जेव्हा संघातील स्टाफ सोबत बोलत असतो, ते सगळे आयपीएल स्पर्धा नक्की होणार याबद्दल विश्वास आहे, मी देखील व्यवहारीक कारणांसाठी आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सूक आहे.” असे कमिन्सने सांगातले. कोरोना व्हायरसमुळे जगभरात तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे, जगभरातील क्रिकेटसह सर्व व्यावहार ठप्प झाले आहेत. आयपीएलचे तेरावे सत्र देखील अनिश्चीत काळासाठी स्थगीत करण्यात आले आहे, तसेच ऑस्ट्रेलियात यावर्षी नियोजित असलेला टी20 विश्वकप देखील अनिश्चीत आहे. 


​ ​

संबंधित बातम्या