आर्थिक संकटात सापडलेली धावपटू प्राजक्ता गोडबोलच्या मदतीला शिवसैनिक धावले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेत मदत करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, त्यामुळे देशभरात नागरीकांना आर्थीक स्थीती बिकट बनली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या य़ा लॉकडाऊनचा मोठा फटका क्रीडा विश्वाला देखील बसला आहे. घरामध्ये अडकून पडलेले अनेक खेळाडू अडचणीत सापडले आहेत. नागपूरची चोविस वर्षीय धावपटू प्राजक्ता गोडबोले कोरोना व्हायरस आणि उपासमार अशा दुहेरी संकटात सामना करत असताना तीला शिवसेना पक्ष सदस्यांनकडून मदत पुरवण्यात आली आहे.  

प्राजक्ता नादपूरच्या सिरासपेठ भागात तिच्या आई-वडिलांसोबत राहते. प्राजक्ताचे वडिल सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते मात्र अपघातानंतर त्यांना ते बंद करावे लागले तसेच प्राजक्ताची आई  5 ते 6 हजार महिना पगारावर जेवणं बनवण्याचे काम करते. त्यावरतच घराचा खर्च भागत असे, मात्र कोरोना व्हायरसमुळे ते एकमात्र उत्पन्नाचे साधन बंध पडल्याने गोडबोले कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ ओढावली होती. पण आता प्राजक्ताला शिवसेनेकडून मदत पोहचवण्यात आली आहे.

"आफ्रिदीला कश्मीर क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याची इच्छा "

जेव्हा प्राजक्ताच्या परिस्थीतीविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना माहिती कळली त्यानी लगेच पक्ष पदाधिकाऱ्यांना मदत पोहचवण्याच्या सुचना दिल्या. “उध्दव ठाकरेंना प्राजक्ताच्या परिस्थीतीबद्दल कळल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत करण्याचे आदेश दिले आणि  काही दिवसांपुर्वी आम्ही प्राजक्ताच्या घरी राशन तसेच 16 हजार रुपये अशी मदत आम्ही केली, यापुढे देखील संपर्कात राहून आवश्यक ती मदत पुरवत येईल” असे शिवसेना नागपूर शहर प्रमुख प्रकाश जाधव यांनी पीटीआईशी बोलताना सांगीतले. 

प्राजक्ताने आतापर्यंत 2019 साली इटलीत झालेल्या विश्व विद्यालय खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 5 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत या स्पर्धेत प्राजक्ताने 18:23.92 अशी वेळ नोंदवली. मात्र अंतिम फेरीत दाखल होण्यात तिला अपयश आलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या भुवनेश्वर हाफ मॅरेथॉनमध्येही प्राजक्ताने दुसरा क्रमांक पटकावला होता.


​ ​

संबंधित बातम्या