स्वातंत्र्य सैनिकांच्या पंढरीत रंगणार फुटबॉलची स्पर्धा

हेमंत पवार
Saturday, 6 February 2021

फुटबॉल टीमने खेळाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

कऱ्हाड : स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या तांबवे गावातील युवकांना फुटबॉलचे चांगलेच वेड लागले आहे. आठ वर्षांपासुन गावात सुरु झालेला हा खेळ आता गावात चळवळ बनला आहे. त्यातूनच कोयनाकाठ चॅरीटेबल ट्रस्टमार्फत सुरु असलेल्या फुटबॉल टीमने 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार या  स्पर्धेचे उदघाटन करणार आहेत.  

तांबवे येथे 2012 साली केवळ आठ ते दहा युवकांनी टाईमपास म्हणून फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली. टप्याटप्याने या खेळाची आवड वाढत गेली. दहा युवकांवर झालेली सुरुवात आज 100 च्या घरात गेली आहे. त्यामध्ये युवकांबरोबर ज्येष्ठांचाही सहभाग असतो. तांबवे गावात दररोज पहाटे सहाच्या सुमारास खेळाडू एकत्र येतात. फुटबॉल खेळण्यासाठी तांबवेसह साजूर, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे, आरेवाडी, साकुर्डी, किरपे, वसंतगड, पश्‍चिम सुपने व कऱ्हाड शहरातीलही युवक येतात. या परिसरातील फुटबॉल खेळाडूच्या दररोजच्या हजेरीमुळे तांबवे गाव हे फुटबॉलचं गाव म्हणून ओळख निर्माण करू लागले आहे. 

पंतने गडबडीत कॅच सोडला; पण यष्टीमागच्या बडबडीत कमी पडला नाही; व्हिडिओ व्हायरल

फुटबॉल टीमने खेळाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केलेली आहे. फुटबॉलचे वेड असलेल्या या तांबवे गावात ट्रस्टच्या फुटबॉल टीमने धाडसाने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी खासदार श्रीनिवास पाटील व आमदार रोहित पवार येणार आहेत. फुटबॉल स्पर्धेतील प्रथम क्रमाकांच्या विजेत्या संघास 25 हजार 555 रूपये व ट्रॉफी, व्दितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघास 17 हजार 777 रूपये व ट्रॉफी, तीसऱ्या क्रमांकाच्या संघास 11 हजार 111 रूपये व चौथ्या संघास 5 हजार 555 रूपये व ट्रॉफी देण्यात येईल. स्पर्धेसाठी येणाऱ्या संघाची निवासाची व जेवणाचीही व्यवस्था ट्रस्टतर्फे केली जाणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या