सांगवीच्या विराज जाधवला 'पै. खाशाबा जाधव' बहुमान 

रमेश मोरे
Thursday, 24 December 2020

येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील विराज जाधव याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुरुष वर्गातील 2019-20 या शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून 'पै. खाशाबा जाधव सुवर्णपदक' बहुमानासाठी निवड झाली आहे. 

जुनी सांगवी : येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील विराज जाधव याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुरुष वर्गातील 2019-20 या शैक्षणिक वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून 'पै. खाशाबा जाधव सुवर्णपदक' बहुमानासाठी निवड झाली आहे. 

ठरलं तर मग; 2022 पासून आयपीएलमध्ये अतिरिक्त दोन संघ  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळामार्फत विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधून पुरुष व महिला वर्गातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात येते. सर्वोत्कृष्ट खेळाडू हा बहुमान प्राप्त विद्यार्थ्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष 2014-15 पासून 'पै. खाशाबा जाधव सुवर्णपदक' व 51 हजार रुपये रोख देऊन गौरव करण्यात येतो. 

मूळ सांगलीचा असलेल्या व महाविद्यालयामध्ये इतिहास विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विराजने आतापर्यंत उदयपूर (राजस्थान) येथे झालेल्या अंतर विद्यापीठ कायकिंग ऍण्ड कॅनो ईग स्पर्धेत (नौकानयन) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहभाग घेत दोन सुवर्णपदक, एक रौप्यपदक व एक ब्रॉंझपदकाची कमाई केली. आतापर्यंत पाच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 15 सुवर्णपदक, सहा रौप्यपदक व चार ब्रॉंझपदक पटकाविले. तसेच, पाच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेत दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणीमध्ये सहभाग नोंदविला आहे. 

AUSvsIND : मरगळ झटकून भारतीय संघाची सरावाला सुरुवात 

विराज जाधव याच्या यशस्वी वाटचालीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. विद्या पठारे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या देदीप्यमान यशाबद्दल उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव डॉ. संदीप कदम, मोहनराव देशमुख, लक्ष्मणराव पवार, आत्माराम जाधव यांनी विराज जाधव व बाबूरावजी घोलप महाविद्यालयाचे अभिनंदन केले.


​ ​

संबंधित बातम्या