400 मीटर हर्डल्समध्ये चुरशीच्या शर्यतीत पुण्याच्या सिद्धेशची सुवर्ण कामगिरी
सिद्धेश चौधरी हा मुळचा नायगाव येथील रहिवाशी असुन, सध्या सिध्देश बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत आहे.
लोणी काळभोर (पुणे)- गुवाहाटीमध्ये (आसाम) मध्ये नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत नायगाव (ता. हवेली) येथील सिद्धेश चौधरी याने सुवर्ण पदक पटकावले आहे. सिद्धेश चौधरी हा महाराष्ट्र संघाकडुन स्पर्धेत उतरला आहे.
गुवाहाटी मध्ये नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलांच्या चारशे मीटर हर्डल्समध्ये पुण्याच्या सिद्धेश चौधरी आणि स्वयंम बधे यांच्यात जबरदस्त चुरस पहायला मिळाली, अखेरीस सिद्धेशने ५३.९१ सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावले, तर स्वयंमने 53.94 सेकंद वेळेसह रौप्य पदक मिळविले. राजस्थानच्या अंकितने ब्रांझ पदक मिळविले.
पोलिस काकांच्या लेकीची गोल्डन कामगिरी; राष्ट्रीय स्तरावर उंचावलं साताऱ्याचं नाव
सिद्धेश चौधरी हा मुळचा नायगाव येथील रहिवाशी असुन, सध्या सिध्देश बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत आहे. तो पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याचे आईवडील दोघेही शेती करत असून घरची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. आईवडीलांनी शेतीमध्ये कष्ट करून त्याला शिक्षण व प्रशिक्षण देत आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्राने आठ सुवर्ण, दहा रौप्य, अकरा ब्रान्झ अशी एकुण 29 पदके जिंकली आहेत. महाराष्ट्र पदक तक्त्यात पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर हरियाणा, दुस-या स्थानावर तामिळनाडू, तिस-या स्थानावर उत्तर प्रदेश, केरळ चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान सिद्धेश चौधरी याने मिळवलेल्या सुवर्ण पदक पदकामुळे नायगाव व परीसरात आनंदाचे वातावरण आहे.