क्रिकेट गुणवत्ता शोध; वर्षभर विनामूल्य प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 March 2021

 सफाळे परिसरात आठ एकर जागेत ओमटेक्‍स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट या संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

विरार : शार्दुल ठाकूरसारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तयार झालेल्या पालघर परिसरातील खेळाडूंना सर्व उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून ओमटेक्‍स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट, सफाळे या संस्थेने गुणवत्ता शोध विकास मोहीम हाती घेतली आहे. सफाळे परिसरात आठ एकर जागेत ओमटेक्‍स आयसीडब्लूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट या संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

INDvsENG : रणनिती बदला नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल; मायकल वॉनचा टीम इंडियाला सल्ला

संस्थेने येत्या 2, 3 व 4 एप्रिल रोजी टॅलेंट हंट कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या अंतर्गत अनुक्रमे 19 वर्षांखालील, 16 वर्षांखालील आणि 14 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या गुणवंत क्रिकेटपटूंना तज्ज्ञ क्रिकेट प्रशिक्षकांकडून एक वर्ष विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9321438723 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रकल्पाचे प्रमुख आणि माजी कसोटीपटू सुरू नायक यांनी केले आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या