फुटबॉल महासंघ निवडणुकीसाठी 21 राज्य संघटना आग्रही?
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची घटना तयार होईपर्यंत महासंघाची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी कार्यकारिणीने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे.
नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची घटना तयार होईपर्यंत महासंघाची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी कार्यकारिणीने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे, पण त्याचवेळी संलग्न 21 राज्य संघटनांनी निवडणूक ठरल्यानुसार 21 डिसेंबरला घेण्याची सूचना केली असल्याचे समजते.
मॅराडोना यांच्यानंतर आणखी एका दिग्गज फुटबॉलपटूचे निधन
महासंघाची वार्षिक सभा त्याचदिवशी आहे. राष्ट्रीय क्रीडासंहितेनुसार तीन टर्म तसेच बारा वर्षे झाल्यामुळे प्रफुल पटेल आता महासंघाचे अध्यक्ष राहू शकणार नाहीत. संलग्न संघटनांनी एकत्रित नव्हे तर स्वतंत्रपणे पत्र लिहून निवडणुकीची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रोनाल्डोविना युव्हेंटिसचा विजय दुष्काळच
बंगाल सोडल्यास पूर्वेतील बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड यांच्यासह दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश यांनी निवडणुकीसाठी आग्रह धरल्याचे समजते.