ला लिगा : मेस्सीच्या 700 व्या गोलचा जल्लोष झाला, पण...

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लिगा' स्पर्धेत एटलेटिको माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील सामन्यादरम्यान लियोनल मेस्सी ने आपल्या प्रोफेशनल करिअर मधील 700 वा गोल नोंदवला. मात्र एटलेटिको माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यात झालेला हा सामना अनिर्णित राहिला.

स्पॅनिश फुटबॉल लीग 'ला लिगा' स्पर्धेत एटलेटिको माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील सामन्यादरम्यान लियोनल मेस्सी ने आपल्या प्रोफेशनल करिअर मधील 700 वा गोल नोंदवला. मात्र एटलेटिको माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यात झालेला हा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघातील खेळाडूंनी अटीतटीचा खेळ करत प्रत्येकी 2-2 गोल केले. त्यामुळे बार्सिलोनाचा संघ आता गुणतालिकेत फक्त एका अंकांनी रिअल माद्रिद नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील काही दिवसांपासून बार्सिलोना आणि रिअल माद्रिद या संघांमध्ये  'ला लिगा' स्पर्धेतील अव्वल स्थानासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

सेरी ए फुटबॉल : जीनोआ विरुद्ध क्रिस्टियानो रोनाल्डोचा रॉकेट गोल  

एटलेटिको माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यात काल मंगळवारी झालेल्या सामन्यात, खेळाच्या सुरवातीला 11 व्या मिनिटाला लियोनल मेस्सीच्या कॉर्नरवर एटलेटिको माद्रिदच्या डिएगो कोस्टमुळे बार्सिलोनाला सहजगत्या गोल झाल्यामुळे सामन्यात आघाडी घेता आली. मात्र त्यानंतर एटलेटिको माद्रिदच्या साउल निगुएजने 19 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी वर बार्सिलोना विरुद्ध गोल करत बरोबरी साधली. यानंतर पुन्हा 50 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे रूपांतर लियोनल मेस्सीने गोल मध्ये करत बार्सिलोना संघाला 2 - 1 अशी बढत मिळवून दिली. पण ही बढत बार्सिलोना संघाला फार काळ टिकवता आली नाही. 62 व्या मिनिटाला साउल निगुएजने पुन्हा पेनल्टीच्या बळावर गोल करत, 2 - 2 अशी बरोबरी साधली.

कोरोनामुळे आता फुटबॉल मधील 'ही' स्पर्धा रद्द 

या सामन्यात लियोनल मेस्सीने गोल करताना, आपल्या प्रोफेशनल करिअर मध्ये 860 सामन्यांमध्ये भाग घेत 700 गोलचा टप्पा पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये मेस्सी अर्जेंटिना आणि क्लब मध्ये खेळताना बार्सिलोना कडून मैदानावर उतरतो. यापूर्वी ऑस्ट्रियाच्या जोसेफ बिकन याने प्रोफेशनल करिअर मध्ये सर्वाधिक 805 गोल केले आहेत. तर  क्रिस्टियानो रोनाल्डोने आत्तापर्यंत 735 गोल केले आहेत.  

#वर्णभेदाचा_खेळ :विंडीजचा संघ कॉलर 'टाइट' करुन 'फाइट' देणार                       

एटलेटिको माद्रिद  आणि बार्सिलोना यांच्यातील सामना अनिर्णित झाल्यामुळे,  बार्सिलोना संघाचे गुण 33 सामन्यांमध्ये 70 झाले आहेत. त्यामुळे रिअल माद्रिद संघ बार्सिलोना पेक्षा एका अंकाने पुढे आहे. रिअल माद्रिदच्या संघाने 32 सामन्यांमध्ये 71 अंक मिळवले आहेत. आणि एटलेटिको माद्रिदने 33 सामन्यातील 15 सामन्यांमध्ये विजय मिळवत 59 अंकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.      

 

 


​ ​

संबंधित बातम्या