...म्हणून मेस्सीचं 'विलगीकरण' प्रॅक्टिस

टीम ई-सकाळ
Friday, 5 June 2020

पुढील आठवड्यापासून फुटबॉलमधील लोकप्रिय असलेल्या ला लिगा स्पॅनिश लीग स्पर्धेलाही सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच बार्सिलोना आणि मेस्सीच्या चाहत्यांची चिंता वाढवणारे वृत्त आहे.

माद्रिद : कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सुन्न पडलेली खेळाच्या मैदानात कल्ला करण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. वेगवेगळ्या देशातील स्थगित स्पर्धा पुन्हा सुरु होत आहेत. पुढील आठवड्यापासून फुटबॉलमधील लोकप्रिय असलेल्या ला लिगा स्पॅनिश लीग स्पर्धेलाही सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच बार्सिलोना आणि मेस्सीच्या चाहत्यांची चिंता वाढवणारे वृत्त आहे. बास्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दुखापतीतून जातोय. स्नायू दुखावल्यामुळे त्याने स्वतंत्र सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. बार्सिलोना संघाने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.

अमेरिकेतील 'त्या' घटनेवर व्यक्त होताना फेडरर झाला निशब्द! 

लिओनेल मेस्सीला स्नायूची दुखापत झाली आहे. आगामी स्पॅनिश लीगमध्ये मैदानात उतरण्यासाठी अडचणी वाढू नये म्हणून त्याने संघापासून वेगळे राहून सराव करत आहे. मेस्सीच्या डाव्या पायाच्या स्नायू दुखापत सतावत असून दुखापत किरकोळ असून खबरदारी म्हणून तो स्वतंत्र सराव करत असल्याचे सांगण्यात आले आहे.   

वर्णभेदाच्या मुद्यावर केएल राहुलने शेअर केली भावनिक पोस्ट

बार्सिलोनाच्या निवेदनानुसार, या दुखापतीतून तंदूरुस्त होण्यासाठी आवश्यक त्या व्यायामावर तो भर देत आहे. दुखापत बळावू नये याचीही खबरदारी घेतली जात आहे. संघाचा पहिला सामन्यासाठी केवळ आठ दिवस उरले आहेत. काही दिवसात तो संघाच्या ताफ्यात सामील होईल, असेही निवेदनात म्हटले आहे. मागील तीन महिन्यांपासून ला लिगाही स्पॅनिश लीगमधील सामने स्थगित करण्यात आले आहेत. 13 जून रोजी बार्सिलोनाचा संघ  मालोर्काला रवाना होणार आहे. बुधवारी सराव केल्यानंतर गुरुवारी मेस्सीने संपूर्ण दिवस विश्रांती घेतली होती.   

जॉर्डच्या मृत्यूनंतर वर्णभेदाच्या मुद्यावरुन गेलनं केला गौफ्यस्फोट

स्नायू दुखापतीमुळे मेस्सी ला लिगाच्या सुरुवातीच्या हंगामात दोन महिने संघाबाहेर होता. लॉकडाउनच्या काळात मिळालेला वेळ आणि त्यानंतर सुरु होणाऱ्या हंगामासाठी तो पूर्ण सज्ज होईल, अशी चाहत्यांना आशा होती. मस्सीने लीगमध्ये सर्वाधिक 19 गोल नोंदवले आहेत. शिवाय त्याने 12 गोल डागण्यात संघाला बहुमोल अशी मदत केली होती.  रिअल माद्रिदचा करीम बेंजामा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मेस्सी आणि त्याच्यामध्ये 5 गोलचे अंतर आहे.  


​ ​

संबंधित बातम्या